bjp wins nagarpali | Sarkarnama

लोहा नगर पंचायतीत प्रताप चिखलीकरांनी कमळ फुलविले

 बापू गायखर
सोमवार, 10 डिसेंबर 2018

लोहा :लोहा नगरपालिका निवडणूक अटीतटीची  झाली. काॅंग्रेसचे माजी मुख्यमंत्री तथा प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याविरूद्ध भाजपाचे प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी एकाच दिवशी प्रचारात एकमेकाविरूद्ध दंड थोपटले होते. भाजपच्या माध्यमातून  निवडणुकीचे शिलेदार होते आमदार प्रताप पाटील चिखलीकर. चिखलीकरांनी कमळ फुलवून चव्हाण यांनी धक्का दिला.

अशोक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली  लोहा मतदारसंघातील माजी आमदार रोहिदास चव्हाण यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढवली गेली. विशेषत: सिल्लोडचे माजी मंत्री अब्दुल सत्तार , लातूरचे धीरज देशमुख , कंधार पालिकेचे नगराध्यक्ष अरविंद नळगे आदिंच्या प्रचार सभा गाजल्य असतांनाही त्यांचा प्रभाव यत्किंचितही  लोहा पालिका निवडणुकीत पडला नसल्याचे स्पष्ट झाले. 
मतदारांनी नवरा -बायकोच्या दोन जोड्या निवडल्या.

नगराध्यक्ष पदी भाजप उमेदवार गजानन सूर्यवंशी विजयी झाले. भाजपचे नगराध्यक्ष उमेदवार गजानन सूर्यवंशी त्यांच्या पत्नी गोदावरी सूर्यवंशी आणि केशवराव चव्हाण मुकदम  त्यांच्या पत्नी  कल्पना चव्हाण या दोन जोड्या  विजयी झाल्या आहेत.

लोहा नगरपालिका निवडणूक निकाल असा: भाजप १३, काँग्रेस ४

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख