हवेली पंचायत समिती सभापतीपदी भाजपच्या फुलाबाई कदम

हवेली पंचायत समितीचे एकवीस सदस्य असुन, सध्या अकरा सदस्यासह पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे पुर्णपणे वर्चस्व आहे. तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचेही सहा पंचायत समिती सदस्य असुन, शिवसेनेचे चार पंचायत सदस्य आहेत. यंदाचे सभापतीपद अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव आहे.
Phulabai Kadam Wins Haveli Panchayat Chairman Post NCP Sunny Kalbhor Deputy Chairman
Phulabai Kadam Wins Haveli Panchayat Chairman Post NCP Sunny Kalbhor Deputy Chairman

लोणी काळभोर : हवेली तालुका पंचायत समितीच्या सभापतीपदी भारतीय जनता पक्षाच्या फुलाबाई अशोक कदम यांची अपेक्षेप्रमाने बिनविरोध निवड झाली. मात्र उपसभापतीपदाची निवडणुक मात्र अनेक नाट्यपूर्ण घडामोडींनी गाजली. 

उपसभापती पदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीचे उमेदवार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार यांना समसमान मते मिळाल्याने, उपसभापतीपदाच्या निवडीसाठी प्रशासनाला अखेर ईश्वरी चिठ्ठीचा पर्याय निवडावा लागला. यात ईश्वरी चिट्ठीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने कौल दिल्याने, उपसभापतीपदी या पक्षाचे सनी उर्फ युगंधर मोहन काळभोर यांची निवड झाली. 

हवेली पंचायत समितीचे एकवीस सदस्य असुन, सध्या अकरा सदस्यासह पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे पुर्णपणे वर्चस्व आहे. तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचेही सहा पंचायत समिती सदस्य असुन, शिवसेनेचे चार पंचायत सदस्य आहेत. यंदाचे सभापतीपद अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव आहे. पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे पुर्णपणे वर्चस्व असले तरी, अनुसूचित जातीची महिला सदस्य राष्ट्रवादीकडे नसल्याने, सभापतीपद भारतीय जनता पक्षाकडे जाणार ही बाब महिनाभरापुर्वीच स्पष्ठ झाली. 

यामुळे नांदेड गणातुन निवडून आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या फुलाबाई कदम यांची अपेक्षेप्रमाने सभापतीपदी बिनविरोध निवड झाली. राज्यात भारतीय जनता पक्ष व शिवसेनेत विस्तव जात नसताना, हवेली पंचायत समितीच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला रोखण्यासाठी दोन्ही पक्षानी युतीचा फॉर्मुला अमलात आणण्याची रणनिती आखली. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पंचायत समिती सदस्या कावेरी कुंजीर यांनी उघडपणे पक्षाच्या विरोधात भुमिका घेतल्याने, सभापती पदाच्या निवडणुकीत नशीबाचा कौल मिळाला असला तरी, उपसभापतीपदाची निवडणुक मात्र नाट्यपूर्ण घडामोडींनी गाजली. 

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी राष्ट्रवादीचाच उपसभापती व्हावा यासाठी तर दुसरीकडे आमदार भीमराव तापकीर यांच्यासह भारतीय जनता पक्ष व शिवसेनेचे तालुका नेतृत्वाने युतीचा उपसभापती व्हावा यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने तिचे महत्व वाढले होते. 

उपजिल्हाधिकारी सुधीर जोशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या निवडणुकीत उपसभापतीसाठी राष्ट्रवादीकडुन सनी काळभोर तर शिवसेनेच्या वतीने नारायण आव्हाळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. तर भारतीय जनता पक्षाच्या वतीने अनिल टिळेकर तर अनिरुध्द यादव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. 

उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या निर्धारीत वेळेत भारतीय जनता पक्षाच्या दोन्ही उमेदवारांनी आपआपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने उपसभापतीपदाची निवडणुक घेण्यात आली. प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादी कॉग्रेसच्या पंचायत समिती सदस्या कावेरी कुंजीर यांनी उघडपणे पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली. यामुळे युतीचे पारडे जड झाले असे वाटत असतानाच, ऐनवेळी भारतीय जनता पक्षाचे सदस्य अनिल टिळेकर मतदानाला गैरहजर राहिले. यामुळे सनी काळभोर व नारायण आव्हाळे या दोघांनाही दहा मते पडली. त्यामुळे चिठ्ठीव्दारे निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

यात सनी काळभोर यांच्या नावाची चिठ्ठी निघाल्याने, निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर जोशी यांनी उपसभापतपदी सनी काळभोर यांची निवड झाल्याची घोषणा केली. युतीच्या स्थानिक नेत्यांनी राष्ट्रवादीच्या एका सदस्याला गळाशी लाऊन 'चमत्कार' केला असतानाही, चिठ्ठी प्रक्रियेने मात्र  आमदार अशोक पवार यांच्या एकनिष्ठ सनी काळभोर यांना 'नमस्कार' केला. 

दरम्यान निवडीनंतर आमदार भीमराव तापकीर यांच्या हस्ते नूतन सभापती फुलाबाई कदम यांचा सत्कार करण्यात आला. तर उपसभापती सनी काळभोर यांचा सत्कार राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, माजी आमदार जगन्नाथ शेवाळे व तालुका अध्यक्ष दिलीप वाल्हेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com