बाळासाहेबांची पोस्टर्स लावून भाजपनेही राज्यात आणि देशात सत्ता मिळविली, संजय राऊतांचे शहांना उत्तर 

बाळासाहेबांची पोस्टर्स लावून भाजपनेही राज्यात आणि देशात सत्ता मिळविली, संजय राऊतांचे शहांना उत्तर 

मुंबई : 25 वर्ष भाजपने बाळासाहेबांचे पोस्टर लावूनच महाराष्ट्रात आणि देशात मते मागितली आणि सत्ता मिळवली असे प्रतित्तूर शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांना दिले आहे. तर दुसरीकडे मातोश्रीवर जन्म घेतलेली माणसं कधीही खोटं बोलत नाही असे सांगत शहा हे खोटं बोलत असल्याचे राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. 

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शहा यांनी शिवसेनेबरोबर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीवर आगपाखड केली आहे. ते म्हणाले, की आम्ही आजपर्यंत वारंवार सांगत आलो आहोत की शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाचे कोणतेही आश्‍वासन दिले नव्हते.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे हे माझ्यासोबत अनेक जाहीरसभा झाल्या. या सभांमध्ये सांगत होतो की देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील. तेव्हा मात्र ते काहीही बोलत नव्हते.त्यावेळी त्यांनी मला का विरोध केला नाही ? हा माझा प्रश्‍न आहे असे शहा यांनी म्हटले आहे. 

शहांचे विधानावर राऊत यांनी त्यांच्यावर पलटवार केला आहे. भाजपचे पोस्टर लावूनच भाजप मोठा झाल्याचा टोला लगावला आहे. अमित शहा हे मोठे नेते आहेत. ते मोठ्या गप्पा मारत असतात. बाळासाहेबांचीही 25 वर्षे पोस्टर्स लावून कोण मोठे झाले कोणी निवडणुका जिंकल्या हे सांगण्याची गरज नाही. 

दरम्यान, राऊत यांच्या सुरात सूर मिसळताना जितेंद्र आव्हाड यांनीही शहा यांच्यावर टीकेची झोड उठविली आहे. ते म्हणाले, की उद्धव ठाकरे संवेदनशील नेते आहेत. फक्त फोटोवरून निवडणुका जिंकता येत नाही.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com