सावनेर विधानसभा मतदारसंघात कमळ फुलविणार : डॉ. राजीव पोतदार

विधानसभा निवडणुकीमध्ये सावनेर विधानसभा क्षेत्रामध्ये जिवाचेरान करून भाजपाचे कमळ फुलविणारच, असा निर्धार भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांनी केला.
सावनेर विधानसभा मतदारसंघात कमळ फुलविणार : डॉ. राजीव पोतदार

नागपूर : विधानसभा निवडणुकीमध्ये सावनेर विधानसभा क्षेत्रामध्ये जिवाचे रान करून भाजपाचे कमळ फुलविणारच, असा निर्धार भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांनी केला. 

सध्या येथे कॉंग्रेसचे सुनील केदार आमदार आहेत. 25 वर्षांपासून पक्षाचे काम करीत असून जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची फळी जमेची बाजू आहे. कार्यकर्त्यांच्या बळावर पक्षाचे संघटन उभे आहे. इर्षा, व्देष, मत्सर बाजुला सारून येणाऱ्या निवडणुकीत सावनेरमध्ये भाजपचा उमेदवार निवडून आणणार असल्याचे डॉ. पोतदार म्हणाले.

यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार कृपाल तुमाने, आमदार समीर मेघे, आमदार सुधीर पारवे, माजी आमदार आशीष देशमुख, महापौर नंदा जिचकार, जिल्हा परीषद अध्यक्ष निशा सावरकर, डॉ. वर्षा पोतदार, माजी आमदार अशोक मानकर, स्मृती इखार, प्रियंका मोहटे, सोनबा मुसळे, मिनाताई तायवाडे, चरणसिंह ठाकुर, संजय टेकाडे, अरविंद गजभिये, अशोक धोटे, रामराव मोवाडे, इमेश्वर यावलकर, प्रकाश वरूळकर, शुभांगी वैद्य आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com