bjp will seat on apposition | Sarkarnama

एकच लक्ष, भाजप विरोधीपक्षात बसणार की सत्तेत ! 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

मुंबई : महाराष्ट्राचे प्रभारी भूपेंद्र यादव दिल्लीचा निरोप घेऊन काही वेळापूर्वीच वर्षावर दाखल झाले आहेत. वर्षावर सुरू असलेल्या कोअर कमिटींगच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब होणार आहे. 

शिवसेनेला मुख्यमंत्रीपदासाठी पिांठबा द्यायचा की नाही हा कळीचा मुद्दा बनला आहे. शिवसेनेने आतापर्यंत आपले प्राधान्य भाजपलाच दिले आहे. उद्धव ठाकरे हे अजूनही आपण युती तोडली नसल्याचे सांगत आहेत. जर शिवसेना राष्ट्रवादी, कॉंग्रेसबरोबर गेली तर भविष्यात राजकीय समिकरणे बदलण्याची शक्‍यताही व्यक्त केली जात आहे.

शिवसेनेने आपली ताठर भूमिका सोडली नाही. मात्र भाजपने नमते घेतले तर पुन्हा महायुतीचे सरकार सत्तेवर येऊ शकते. कोअर कमिटीला अमित शहा मार्गदर्शन करीत आहे. भाजप एक पाऊल मागे घेते की शिवसेनेपासून फारकत घेते ही सर्वात मोठी बातमी असणार आहे. 

आता पर्यंत आपण पालखीचे भोई होतो... आता यापुढे आपण पालखीचे भोई होणार नाही... तर आता मी त्याच पालखीत शिवसैनिकाला बसवल्याशीवाय रहाणार नाही असे सांगत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख