BJP Will Not form Government in Maharashtra | Sarkarnama

.....तर शिवसेनेला आमच्या शुभेच्छा - चंद्रकांत पाटील

सरकारनामा ब्युरो
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

राज्यात निर्माण झालेला सत्तास्थापनेचा तिढा अधिक गुंतागुंतीचा बनला असून आपण सरकार स्थापन करु शकत नसून जर शिवसेनेला जनादेशाचा अनादर करुन काँग्रेस - राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊन सरकार स्थापन करायचे असेल तर आमच्या शुभेच्छा असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांना सांगितले.

मुंबई - राज्यात निर्माण झालेला सत्तास्थापनेचा तिढा अधिक गुंतागुंतीचा बनला असून आपण सरकार स्थापन करु शकत नाही, असे भाजपने राज्यपालांना सांगितले असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांना सांगितले.

भाजपने कोअर कमिटीच्या बैठकीनंतर आज राज्यपालांची भेट घेतली. या भेटीनंतर चंद्रकांत पाटील म्हणाले, "नुकत्याच झालेल्या निवणुकीत भाजप व मित्रपक्षांच्या युतीला जनतेने भरघोस जनादेश दिला. म्हणूनच राज्यपालांनी भाजपला सरकार स्थापनेसाठी निमंत्रण दिले. आम्ही निवडणूक महायुती म्हणून लढलो, जनादेश महायुतीला मिळाला. पण शिवसेनेला बरोबर येण्याची इच्छा नाही. त्यामुळे आत्ता आम्ही सरकार स्थापन करु शकत नाही," असे आम्ही राज्यपालांना सांगितले. जनादेशाचा अपमान करुन शिवसेनाला काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर सरकार स्थापन करायचे असेल तर आमच्या शुभेच्छा आहेत, असेही ते म्हणाले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख