`महाविकास आघाडीकडून सरसकट कर्जमाफी एेवजी सरसकट फसवणूक'

जनतेचा अपमान करुन सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी न देता त्यांची सरसकट फसवणूक केली आहे. सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे महिला व मुलींवर अत्याचार वाढले आहेत. त्याच्या निषेधार्थ भाजपतर्फे आता 25 फेब्रुवारीला राज्यातील सर्व तहसिल कार्यालयांसमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
bjp will hold agitation on 25 february in front of all tehsils 
bjp will hold agitation on 25 february in front of all tehsils 

सोलापूर : जनतेचा अपमान करुन सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी न देता त्यांची सरसकट फसवणूक केली आहे. सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे महिला व मुलींवर अत्याचार वाढले आहेत. त्याच्या निषेधार्थ भाजपतर्फे आता 25 फेब्रुवारीला राज्यातील सर्व तहसिल कार्यालयांसमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या निर्देशानुसार आंदोलनाचे नियोजन करण्यात आल्याचेही ते म्हणाले.

भाजपचा विश्‍वासघात करुन शिवसेनेने कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत सत्ता स्थापन केली. सरसकट कर्जमाफीची घोषणा केली, मात्र सत्तेवर आल्यावर अवघ्या दोन लाखांची कर्जमाफी दिली. नियमित कर्ज फेडणाऱ्यांसह दोन लाखांवरील कर्जदारांचा निर्णयही अद्याप जाहीर केलेला नाही. तूर खरेदी, पिकविमा याचे निकषही बदलेले. बाजार समित्यांच्या निवडणुकीत शेतकऱ्यांना दिलेला मतदानाचा हक्‍कही काढून घेतला. शेतकरी हिताचे निर्णय घेण्याऐवजी पूर्वीचे निर्णय रद्द करण्याचा सपाटा महाविकास आघाडीने घेतला आहे. त्याविरोधात हे आंदोलन असल्याचेही श्री. पवार यांनी या वेळी स्पष्ट केले.

तसेच हिंगणघाटची दुर्घटना, सोलापुरातील अल्पवयीन मुलींवर 16 जणांनी केलेला अत्याचार आणि मजरेवाडीतील एका अल्पवयीन मुलीवर झालेला अत्याचार, याविरोधातही हे आंदोलन असल्याचे त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस आमदार सुभाष देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, राजकुमार पाटील, गजानन भाकरे, श्रीमंत बंडगर, काशिनाथ कदम आदी उपस्थित होते.

बारामतीच्या पाणीप्रश्‍नी लवकरच रणनिती
शेतकऱ्यांच्या हक्‍काचे पाणी त्यांनाच मिळावे या हेतूने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीच्या उद्योगांचे पाणी बंद करण्याचा निर्णय घेतला. आता महाविकास आघाडी सरकारने ते पाणी पुन्हा उद्योगांनाच देण्याचा निर्णय घेतला. त्याविरोधात लवकरच आंदोलन करण्यात येणार असून त्याची रणनिती ठरविली जाईल, असा निर्णय शनिवारी आयोजित भाजपच्या जिल्हा कार्यकारणीच्या बैठकीत घेण्यात आला. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com