विजयाच्या षटकारानंतर विधानसभेला भाजप सेनेला देणार अर्धा वाटा

संपूर्ण भारत मोदीमय झाला असतानाही शिवसेनेला दिलेला शब्द पाळण्याचा निर्णय महाराष्ट्रात अंमलात येणार असून या भावाला बरोबर ठेवण्यासाठी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहकाऱ्यांसह मातोश्री गाठली. दिल्लीला मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए बैठकीला जाण्यास शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तयार नव्हते. पण भाजपने ३५० चा टप्पा गाठल्यावर हा निर्णय योग्य होता, याची मोकळेपणाने कबुली शिवसेनेने दिली असल्याचे समजते.
विजयाच्या षटकारानंतर विधानसभेला भाजप सेनेला  देणार अर्धा वाटा

मुंबई : संपूर्ण भारत मोदीमय झाला असतानाही शिवसेनेला दिलेला शब्द पाळण्याचा निर्णय महाराष्ट्रात अंमलात येणार असून या भावाला बरोबर ठेवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहकाऱ्यांसह मातोश्री गाठली. दिल्लीला मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए बैठकीला जाण्यास शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तयार नव्हते. पण  भाजपने ३५० चा टप्पा गाठल्यावर हा निर्णय योग्य होता, याची मोकळेपणाने कबुली शिवसेनेने दिली असल्याचे समजते.

भारताच्या राजकारणात येती काही वर्षे मोदी पर्व कायम राहणार असल्याने भाजपबरोबर राहण्याचा निर्णय योग्य असल्याचे सेनेचे नेते सांगत आहेत. भाजप कार्यकर्त्यांमध्ये सेनेबद्दल काहीशी नाराजी असली तरी, विधानसभेच्या अर्ध्या जागा त्यांना देण्याचा निर्णय मोदी-शहा यांनी घेतला आहे, असे राज्यात सांगितले जात आहे. सेनेला युतीसाठी राजी करताना राज्य भाजपला बरेच श्रम घ्यावे लागले होते. आनंद अडसूळ, चंद्रकांत खैरे यांच्यासह सुमारे सात खासदारांना उमेदवारी मिळू नये, असे ही भाजपने नमूद केले होते. ही इच्छा पूर्ण केली असती तर सेनेले अधिक तीन जागा जिंकता आल्या असत्या. 

मात्र, सेनेने त्यांच्या जागांबाबत काय ते ठरवावे,असे भाजपने निश्‍चित केले त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रवादीला काही जागा मिळाल्या, अशी खंत एका ज्येष्ठ भाजप नेत्यांनी व्यक्त केली. दोन दिवसांपूर्वी झालेल्या एनडीएच्या बैठकीला हजर राहणे सेना प्रमुखांना आवश्‍यक वाटत नव्हते. सतत भाजपसमवेत असणे चांगले दिसेल काय? असाही विचार त्यांच्या मनात होता. मात्र, आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यानंतर आलेल्या भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या निरोपाचा मान राखा, असे सुचवले. आदित्यचा सल्ला मान्य करत उद्धव तसेच उद्योगमंत्री सुभाष देसाई दिल्लीत पोचले ते बरेच झाले, असे सांगण्यात येत होते. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com