bjp will form government, says acting cm fadanvis | Sarkarnama

भाजपच सरकार तयार करेल - फडणवीस

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019

भाजपच सरकार तयार करेल, असा विश्वास काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही वेळापूर्वी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

पुणे - भाजपच सरकार तयार करेल, असा विश्वास काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही वेळापूर्वी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. 

मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. त्यानंतर कोश्यारी यांनी फडणवीस यांना वैकल्पिय व्यवस्था होईपर्यंत `काळजीवाहू मुख्यमंत्री' म्हणून काम करण्यास सांगितले  आहे. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस बोलत होते. 

कॉंग्रेसच्या आरोपांचा समाचार घेताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की काही लोक जाणीवपूर्वक वक्तव्य करत आहे. त्यांनी आमदार फोडण्याचा पुरावा द्यावा अन्यथा माफी मागावी. भाजप सरकार तयार करताना फोडाफोडीचे राजकारण करणार नाही. येत्या काळात जे सरकार बनेल, ते भाजपच्या नेतृत्वात बनेल. भाजपच सरकार तयार करेल, हा विश्वास व्यक्त करतो.

गेल्या पंधरा दिवसांत सरकार देऊ शकलो नाही, याची खंत वाटत असल्याचेही त्यांनी नमूद केले आणि ही खंत दूर करू, अशी ग्वाही दिली.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख