नाशिक महापालिका प्रकल्पांचे बरे वाईट झाल्यास भाजपची जबाबदारी : छगन भुजबळ

महापालिकेच्या स्मार्ट सिटी अंतर्गत प्रस्तावित परिवहन सेवा दरमहा कोट्यावधींचा तोटा होईल. यामध्ये मुंबईत नाकारलेल्या प्रदुषणकारी बीएस ४ बसेस चालविल्या जाणार आहेत. त्यात पालकमंत्री छगन भुजबळ यांनी लक्ष घालावे यासाठी दबाव येत आहे
Bjp Will be responsible for projects failure in Nashik say Chagan Bhujbal
Bjp Will be responsible for projects failure in Nashik say Chagan Bhujbal

नाशिक : महापालिकेच्या स्मार्ट सिटी अंतर्गत प्रस्तावित परिवहन सेवा दरमहा कोट्यावधींचा तोटा होईल. यामध्ये मुंबईत नाकारलेल्या प्रदुषणकारी बीएस ४ बसेस चालविल्या जाणार आहेत. त्यात पालकमंत्री छगन भुजबळ यांनी लक्ष घालावे यासाठी दबाव येत आहे. यासंदर्भात भुजबळ म्हणाले, ''मी महापालिकेच्या प्रकल्पांत लक्ष घातल्यास विकासाला बाधा आणली जात असल्याचा आरोप होतो. त्यामुळे महापालिकेच्या प्रकल्पांबाबत जे काही बरे वाईट होईल त्याला सत्ताधारी (भाजप) जबाबदार राहील.''

यासंदर्भात बीएस-4 मॉडेलसंदर्भात आयुक्तांशी चर्चा करणार असल्याचे श्री. भुजबळ यांनी सांगितले. असे असले तरी महापालिकेच्या कुठल्याही कामासंदर्भात पालकमंत्री या नात्याने लक्ष घातल्यास विकासाला बाधा आणली जात असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे महापालिकेच्या प्रकल्पांबाबत जे काही बरे-वाईट होईल त्याची जबाबदारी सत्ताधारी पक्षावर राहील, असे सांगत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी महापालिकेच्या निर्णयांपासून दोन हात लांब राहणे पसंत केल्याचे दिसून येत आहे.

महापालिकेतर्फे सुरू होणारी शहर बससेवा आता पुन्हा प्रदूषणकारी बीएस-४ प्रकारच्या मॉडेलवरून वादात सापडली आहे. पुढील दहा वर्षांसाठी या बस नाशिकमध्ये चालविण्याचा मक्तेदार कंपनीचा डाव असल्याने यातून स्वच्छ व सुंदर नाशिकच्या संकल्पनेला तडा जाणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी लक्ष घालण्याचा निर्णय घेतला असून, आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे माध्यमांसमोर स्पष्ट केले.

महापालिकेतर्फे शहरात 'ग्रॉस कॉस्टकटिंग' या तत्त्वावर बससेवा सुरू केली जाणार आहे. दोन वर्षांत अनेक अडथळे पार केल्यानंतर शासनाने गेल्या आठवड्यात परवाने देण्याचा निर्णय घेताना बससेवेला ग्रीन सिग्नल दाखविला आहे. त्यानुसार एप्रिलमध्ये बससेवा सुरू करण्याचे प्रशासनाचे प्रयत्न आहेत. परंतु, महापालिकेने करारनामा करताना त्यात केंद्र शासनाच्या सूचनेनुसार बीएस-६ या नवीन कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी असलेल्या बसचा उल्लेख नसल्याने त्याचा फायदा घेत मुंबई महापालिका हद्दीतील बीएस-४ प्रकारच्या मॉडेलच्या बस नाशिकमध्ये सुरू करण्याचा प्रयत्न मक्तेदाराकडून सुरू आहे. 

त्यासाठी महापालिकेतील काही माजी नगरसेवकही उत्सुक आहेत. १ एप्रिल २०२० पासून देशभरातून बीएस-४ मॉडेलच्या वाहनांची  नोंदणी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईतून अशा प्रकारची वाहने हटवून ती नाशिकमध्ये सुरू करण्याचे प्रयत्न आहेत. पुढील दहा वर्षे या बस नाशिकमध्ये धावणार असून, त्यातून प्रदूषणाला हातभार लागणार आहे. यासंदर्भात पालकमंत्री छगन भुजबळ यांनी लक्ष घालण्याचा निर्णय घेतला असून, आयुक्त गमे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिल्याने आता बीएस-४ मॉडेलचा मुद्दा राज्य शासनाच्या कोर्टात जाणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com