महाशिवआघाडी झाली तर जिल्हा परिषद, नगरपंचायतीत भाजपची पिछेहाट!

शिवसेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादी महाशिवआघाडीचे पावले सरकार स्थापन करण्याच्या दिशेने पडत असल्याचे सध्याचे चित्र आहे. राज्यात महाआघाडीच्या राजकारणाचे सत्ता समीकरण बनले तर राज्यातील जिल्हा परिषद, नगरपंचायतीमध्ये क्रमांक एकवर असलेल्या भाजपला जोरदार फटका बसणार आहे.
MahaShivAghade V-s Bjp
MahaShivAghade V-s Bjp

मुंबई : शिवसेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादी महाशिवआघाडीचे पावले सरकार स्थापन करण्याच्या दिशेने पडत असल्याचे सध्याचे चित्र आहे. राज्यात महाआघाडीच्या राजकारणाचे सत्ता समीकरण बनले तर राज्यातील जिल्हा परिषद, नगरपंचायतीमध्ये क्रमांक एकवर असलेल्या भाजपला जोरदार फटका बसणार आहे. जवळपास सर्वच जिल्हा परिषदांमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष पदे गमावण्याची दाट शक्‍यता निर्माण झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. लवकरच जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची सोडत जाहीर होणार आहे.

शहरी भागाप्रमाणे राज्यातील ग्रामीण भागात जिल्हा परिषदा, पंचायत समिती, नगरपंचायतीमध्ये भाजप क्रमांक एकचा पक्ष बनला असला तरीही शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस असे तीन पक्षांनी मिळून सरकार स्थापन केल्यावर सत्ता समिकरणे बदलणार आहेत. महापौर पदाप्रमाणे जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची अडीच वर्षे इतक्‍या कालावधीसाठी सोडत लवकरच ग्रामविकस विभागाच्या वतीने जाहीर केली जाणार आहे. केवळ चंद्रपूर, वर्धा आणि लातूर या जिल्हा परिषदांत भाजपचे संख्याबळ तुल्यबळ आहे. सर्व विरोधक एकत्र आले तरीही अध्यक्षपदावर दावा करू शकत नाहीत.

मात्र, महाशिवआघाडीने उमेदवार एकत्रित उमेदवार दिला तर जळगाव, औरंगाबाद, जालना, यवतमाळ, बुलढाणा, गडचिरोली, सांगली या सात जिल्हयात महाआघाडीचे अध्यक्ष होउ शकतात. जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजप लगाम लागण्याची चिन्हे आहेत. 

जिल्हा परिषद, नगरपरिषद, पंचायत समिती यात भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला असला तरीही हे तीन पक्ष एकत्र आल्यानंतर तीन पक्षांचे संयुक्‍त बळ हे भाजपपेक्षा जास्त होणार आहे. त्याचा लाभ जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत होणार आहे. तसेच ज्या ठिकाणी भाजप-शिवसेना अशी युती आहे. ती मोडकळीस येण्याची शक्‍यता आहे. त्याचाही फटका भाजपला बसू शकतो.

जिल्हा परिषदांमध्ये बलाबल
भाजप-472, कॉंग्रेस-409, राष्ट्रवादी कॉंग्रेस-345, शिवसेना-313,
नगरपरिषदा, नगरपंचायतीमध्ये बलाबल
भाजप- 1865, कॉंग्रेस-1437, राष्ट्रवादी कॉंग्रेस-1181, शिवसेना-943
पंचायत समितीमधील बलाबल
-भाजप- 1004, राष्ट्रवादी कॉंग्रेस- 744, शिवसेना- 672, कॉंग्रेस-663

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com