BJP at war against a liquor king | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

साताऱ्यात गुरूवारी मध्यरात्रीपासून सात दिवस कडक लॉकडाउन करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता उर्वरित सर्वकाही बंद राहणार आहे.

मद्य सम्राटांविरुद्ध भाजपचा एल्गार 

सरकारनामा  ब्युरो 
बुधवार, 3 मे 2017

प्रशासनाशी संगनमत करून महानगरातील गौरक्षण मार्गावर अनेक मद्य सम्राटांनी आपली दुकाने थाटली. यासाठी महापालिका प्रशासनाची परवानगी न घेताच काहींनी अनधिकृत इमारतींमध्ये दुकाने सुरू केली आहेत.

अकोला: सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बंद पडलेल्या दारू दुकानांचे स्थलांतरण गौरक्षण मार्गावर करण्याचा सपाटा मद्य सम्राटांनी सुरू केला आहे. या परिसरात दारू दुकानांची वाढती संख्या सामाजिक स्वास्थ्य बिघडविणारी असल्याने मद्य सम्राटांविरुद्ध भाजपने एल्गार पुकारला आहे.

प्रशासनाने ही दुकाने त्वरित बंद न केल्यास खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वात दारू दुकानांना ताला ठोको आंदोलन करण्याचा इशारा भाजप नगरसेवकांनी दिला आहे. 

राज्य व राष्ट्रीय महामार्गापासून पाचशे मीटर अंतराच्या आत असलेली दारूची दुकाने बंद करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. या आदेशामुळे महानगरातील दारूची दुकाने बंद झाली. ही दुकाने राज्य व राष्ट्रीय महामार्गापासून लांब स्थलांतरित करण्याचा सपाटा मद्य सम्राटांनी सुरू केला.

प्रशासनाशी संगनमत करून महानगरातील गौरक्षण मार्गावर अनेक मद्य सम्राटांनी आपली दुकाने थाटली. यासाठी महापालिका प्रशासनाची परवानगी न घेताच काहींनी अनधिकृत इमारतींमध्ये दुकाने सुरू केली आहेत. त्यामुळे रस्त्यावर मद्यपींची दुकानासमोर मोठी गर्दी होत असून त्यांची वाहने रस्त्यावरच उभी करण्यात येत असल्याने या मार्गावर ये-जा करणाऱ्या महिला, युवती, विद्यार्थिनींसह आबालवृद्धांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.

परिसरात मद्यपींचा हैदोस वाढत असून वाद-विवाद वाढल्याने सामाजिक स्वास्थ धोक्‍यात आले आहे. त्यामुळे या मार्गावरील दारू विक्रीची दुकाने बंद करण्याच्या मागणीसाठी भाजपच्या नगरसेवकांनी कंबर कसली आहे. 

प्रशासनाने ही दुकाने त्वरित बंद न केल्यास खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वात तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा भाजपचे नगरसेवक विजय इंगळे, बाळ टाले आदींनी दिला आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख