रत्नागिरीत सेनेच्या पायात भाजपचा साप

लोकसभेला सेना-भाजपला युती म्हणून घवघवीत यश मिळाले. विधानसभेला देखील युती म्हणूनच लढण्याचा त्यांचा निर्धार झाला आहे. पालिकेत देखील तसे वातावरण दिसू लागले आहे; मात्र भाजपच्या नूतन जिल्हाध्यक्षांनी पहिल्याच पत्रकार परिषदेत जोरदार बॉंब टाकला.
रत्नागिरीत सेनेच्या पायात भाजपचा साप

रत्नागिरी : युती म्हणून नगराध्यक्षपदाची पोटनिवडणूक लढविण्यामध्ये सेना मश्‍गुल असताना भाजपने सेनेच्या पायात साप सोडला आहे. अडीच वर्ष शिवसेनेकडे नगराध्यक्षपद आहे. पुढील अडीच वर्षे नगराध्यक्षपद भाजपला मिळावे, यासाठी आम्ही आग्रही आहोत, अशी स्पष्टोक्ती भाजपचे नूतन जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी केली. भाजप संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हे स्पष्ट केले. यामुळे सेनेसाठी दुधात मिठाचा खडा पडला आहे.

लोकसभेला सेना-भाजपला युती म्हणून घवघवीत यश मिळाले. विधानसभेला देखील युती म्हणूनच लढण्याचा त्यांचा निर्धार झाला आहे. पालिकेत देखील तसे वातावरण दिसू लागले आहे; मात्र भाजपच्या नूतन जिल्हाध्यक्षांनी पहिल्याच पत्रकार परिषदेत जोरदार बॉंब टाकला. पटवर्धन पोटनिवडणुकीबाबत म्हणाले, "शहरामध्ये भाजपची मोठी ताकद आहे. विधानसभेत देखील माने यांना 55 हजारांवर मते मिळाली. भाजपला दुर्लक्षित करण्यासारखी परिस्थिती नाही. शिवसेनेने अडीच वर्षे पालिकेत नगराध्यक्षपद भोगले आहे. आता युती म्हणून पुढील अडीच वर्ष नगराध्यक्षपद भाजपला मिळावे, यासाठी आम्ही आग्रही आहे. पुढे काय निर्णय घ्यायचा ते परिस्थितीवर ठरवू.''

येथील पालिकेत शिवसेनेची एकहाती सत्ता आहे. थेट नगराध्यक्ष म्हणून जनतेने सेनेचे राहुल पंडित यांना निवडून दिले होते; मात्र पक्षांतर्गत वाटाघाटीमुळे त्यांना अडीच वर्षानंतर पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे नगराध्यक्षपदासाठी पोटनिवडणूक घ्यावी लागणार आहे. शिवसेनेकडून उपनगराध्यक्ष बंड्या साळवी यांचे नाव निश्‍चित आहे. त्यांच्या विरोधात सर्वपक्षीय एकत्र येऊन उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यासाठी नारायण राणे यांच्याबरोबरही बैठक झाली आहे. राष्ट्रवादी, कॉंग्रेस, स्वाभिमान, मनसे आदी पक्षांचा यात समावेश आहे. मात्र, अजून उमेदवार निश्‍चित नाही. या परिस्थितीत नूतन भाजप जिल्हाध्यक्षांनी केलेली मागणी या विरोधी पक्षांचे बळ वाढवणारी आहे.

...तर सेनेच्या स्वप्नांना सुरुंग
युती म्हणूनच पोटनिवडणुकीला सामोरे जाणार, अशा भ्रमात सेना वावरत आहे. भाजपच्या पाठिंब्यावर ही पोटनिवडणूक घेण्याचे धाडस सेनेने केले आहे. भाजपने नगराध्यक्षपदाचा हट्ट धरला तर सेनेच्या स्वप्नांना सुरूंग लागणार आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com