BJP Uttar Pradesh elections Mayawati BSP Narendra Modi | Sarkarnama

भाजपची भरघोस मतांची अपेक्षा फोल ठरणार: मायावती

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 3 मार्च 2017

समाजवादी पक्षाने आपल्या कारकिर्दीत ज्या कल्याणकारी योजना राबविल्या त्याची सुरवात बसप सरकारच्या काळात झाली होती. या योजनांची नावे बदलून त्यांनी त्याचे श्रेय घेतले

चांडोली (उत्तर प्रदेश): उत्तर प्रदेशात पक्षाला भरघोस मतदान होईल ही भाजपची अपेक्षा मात्र, एक अपेक्षाच राहील. राज्यातील जनतेने बसपला विजयी करण्याचा मनोमन निश्‍चय केला आहे, असा विश्वास बहुजन समाजवादी पक्षाच्या (बसप) प्रमुख मायावती यांनी व्यक्त केला.

मायावती म्हणाल्या, ''जातीय सलोखा राखण्याच्यादृष्टीने येथील मतदार बसपला सत्ता सोपवून आपली होळी साजरी करतील. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजप देशातील आरक्षण संपविण्याच्या प्रयत्नात असून, जर का भाजप पक्ष सत्तेत आला तर, तो आरक्षण व्यवस्था कमकुवत करेल किंवा ती संपुष्टात आणेल.''

समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव पुत्रप्रेमाने अंध झाल्याची टीकाही मायावतींनी या वेळी केली. त्या म्हणाल्या, ''बंधू शिवपाल यादव यांना पुत्र अखिलेश यादव यांनी जाणीवपूर्वक वेगळे पाडण्याचा प्रयत्न केला तरी, मुलायमसिंह यांचे पुत्रप्रेम कायम आहे. मुलायम यांनी याकडे दुर्लक्ष करत एकाअर्थी शिवपाल यांचा अपमानच केला''

'सप'ने योजनांचे श्रेय लाटले
समाजवादी पक्षाने आपल्या कारकिर्दीत ज्या कल्याणकारी योजना राबविल्या त्याची सुरवात बसप सरकारच्या काळात झाली होती. या योजनांची नावे बदलून त्यांनी त्याचे श्रेय घेतले, असा आरोपही मायावती यांनी केला आहे. राज्यात बसपची सत्ता आल्यास कायदा व सुव्यवस्था पुन्हा अमलात आणली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख