शिवसेनेने फडणवीसांशिवाय प्रचारात जाऊन पहावे, मग वास्तव कळेल : लक्ष्मण सावजी

आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजपची संघटनात्मक तयारीची बैठक बैठक पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस सरोज पांडे यांच्या उपस्थितीत झाली. त्यावेळी कार्यकर्त्यांत उत्साह निर्माण करण्यासाठी त्यांनी भाजपचाच मुख्यमंत्री होणार असे विधान केले होते. अशी विधाने करावी लागतात. त्यात काहीही गैर नाह- लक्ष्मण सावजी
शिवसेनेने फडणवीसांशिवाय प्रचारात जाऊन पहावे, मग वास्तव कळेल : लक्ष्मण सावजी

नाशिक : ''देवेंद्र फडणवीसांशिवाय शिवसेनेने लोकांमध्ये जाऊन प्रचार करुन दाखवावा. त्यांना त्यांची ताकद कळेल. त्यामुळे नाशिकमध्ये भाजप कार्यालयासमोर फलक लावणाऱ्या शिवसेनेच्या नगरेसविका किरण गामणे- दराडे या कॉंग्रेस, राष्ट्रवादीने पेरलेल्या लोकांचा अजेंडा तर चालत नाही ना? हे शिवसेनेने तपासुन पहावे. कारण लोकसभेला शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांना प्रचारात नाकी नऊ आले होते. त्यांच्याकडे बुथवर देखील लोक नव्हते. भाजपचे कार्यकर्ते बुथवर काम करीत होते,'' असा संताप भाजपचे प्रदेश सरचिटणीस लक्ष्मण सावजी यांनी व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्री भाजपचाच होणार या भाजपच्या दाव्याला प्रत्युत्तर म्हणून शिवसेनेच्या नगरसेविका किरण गामणे- दारडे यांनी आज सकाळी भाजपच्या नाशिक शहर कार्यालयासह शहरात 'महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेना- भाजप युतीचा म्हणजेच शिवसेनेचाच होईल' असे होर्डींग्ज लावेल होते. त्यामुळे भाजप कार्यकर्ते, नेत्यांत नाराजी पसरली. यावरुन शहरात राजकारण तापले. याबाबत प्रतिक्रीया व्यक्त करतांना भाजपचे सरचिटणीस सावजी म्हणाले, ''आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजपची संघटनात्मक तयारीची बैठक बैठक पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस सरोज पांडे यांच्या उपस्थितीत झाली. त्यावेळी कार्यकर्त्यांत उत्साह निर्माण करण्यासाठी त्यांनी भाजपचाच मुख्यमंत्री होणार असे विधान केले होते. अशी विधाने करावी लागतात. त्यात काहीही गैर नाही. मात्र यावर नगरसेविका गामणे यांना प्रतिक्रीया देण्याचा काय अधिकार? त्यांना शिवसेनेने तसे अधिकार दिले आहेत काय?. याचा खुलासा व्हावा. युतीचा फायदा सध्या शिवसेना व भाजप दोन्ही पक्षांना आहे. याची शिवसेनेला जाणीव आहे.''  

या युतीत बाधा आणम्यासाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसने पेरलेल्या काही कार्यकर्त्यांच्या सांगण्यावरुन तर हे होर्डींग्ज लावले नाहीत ना?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.  ते पुढे म्हणाले, ''देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी तर राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामावर लोक खुश आहेत. त्यावर लोकांनी मतदान केले आहे. शिवसेनेने फडणवीसांना वगळून लोकांमध्ये प्रचार करुन पहावा. त्यांना त्यांचे वास्तव कळेल.''

दरम्यान नगरसेविका किरण गामणे यांनी होर्डींग्ज लावण्याचे समर्थन करीत शिवसेना नेतेही मला नक्कीच पाठींबा देतील असा विश्‍वास व्यक्त केला. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी युतीचे ठरलेले आहे, असे जाहीर सांगीतल्यानंतर मुख्यमंत्री भाजपचाच होईल असे विधान करणे युती धर्माला शोभत नाही. भाजपने त्यात सुधारणा करावी असेही त्या म्हणाल्या. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com