bjp two thaousand letters to jawan | Sarkarnama

भाजप जवानांना पाठविणार दोन हजार पत्र 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

औरंगाबाद ः शहर भाजपच्या वतीने एक उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यानूसार 15 ऑगस्ट स्वांतत्रदिनी जम्मू-कश्‍मीरच्या सीमेवर तैनात असलेल्या दोन हजाराहून अधिक जवानांना शहरातील युवक, विद्यार्थी आणि सर्व सामान्य नागरिक पत्र पाठवून स्वातंत्रदिनाच्या शुभेच्छा देणार आहेत.

" तुमच्या मुळेच देशातील सव्वाशे कोटी जनता सुरक्षित आणि मोकळा श्‍वास घेऊ शकत आहे' अशा भावना व कृतज्ञता या पत्राद्वारे व्यक्त केली जाणार आहे. 

देशातील प्रत्येक नागरिकाला सुखाची झोप घेता यावी यासाठी आपल्या कुटुंबापासून लाखो मैल दूर ऊन, वारा, पाऊस, थंडीची तमा न बाळगता डोळ्यात तेल घालून सीमेवर हिंदुस्थानी जवान गस्त घालत असतात. देश आणि येथील नागरिकांची सुरक्षा यालाच त्यांचे सर्वोच्च प्राधान्य असते. 

जवानांच्या या त्याग आणि बलिदानाला स्वातंत्रदिनी पत्र पाठवून सलाम करण्याची संकल्पना औरंगाबाद शहर भाजपच्या कार्यकर्त्यांना सुचली. देशात सगळीकडे स्वातंत्र्याचा उत्सव सुरु असतांना ज्या जवांनामुळे हे शक्‍य झाले त्यांना कदापी विसरून चालणार नाही ही या मागची भावना असल्याचे बोलले जाते. 

शहरातील सर्व वयोगटातील नागरिकांनी पोस्टकार्डवर लष्करी जवानांबद्दल त्यांना काय वाटते ? हे लिहून ते थेट जवानांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न या मोहिमेच्या माध्यमातून केला जात आहे. त्यासाठी शहराच्या विविध भागात भाजयुमो व भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी दोन हजाराहून अधिक पोस्टकार्ड वाटप केले होते. 

नागरिकांनी पोस्टकार्डवर आपल्या प्रतिक्रिया शब्दबध्द केल्यानंतर ही पोस्टर्काड गोळा करून ती थेट जम्मू-कश्‍मीरातील लष्करी छावणीला पाठवण्यात येत आहेत. जेणेकरून 15 ऑगस्ट स्वांतत्रदिनी ही पत्र जवानांच्या हाती पडतील. भाजप शहर-जिल्हाध्यक्ष किशनचंद तनवाणी व मित्रमंडळाच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात येते आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख