राष्ट्रवादीच्या बनकरांवर भाजपचे जाळे

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते, माजी आमदार दिलीप बनकर यांना आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यापुढे ठेऊन पालकमंत्री गिरीष महाजन यांच्यासह विविध नेत्यांनी प्रयत्न सुरु केले आहेत. जिल्हा परिषद निवडणूकीपासून बनकर देखील भाजपच्या जास्तच जवळगेल्याने आगामी काळात निफाडच्या राजकारणात राष्ट्रवादीला झटका देण्यासाठी भाजपची खेळी सुरु आहे.
राष्ट्रवादीच्या बनकरांवर भाजपचे जाळे

नाशिक : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे निफाडचे माजी आमदार व अजित पवार यांचे निकटवर्तीय दिलीप बनकर सध्या भाजपच्या जास्तच प्रेमात पडल्याची चर्चा राजकीय पारावर रंगली आहे. गेल्या दोन निवडणूकांत परभवाचे धनी झालेले बनकर भाजपच्या जाळ्यात अडकल्यास भाजपला एक प्रबळ उमेदवार मिळण्याची संधी आहे. मात्र तालुक्‍यात साचलेले राजकारण प्रवाही होऊन नव्या नेतृत्वाला मिळालेली ही संधी असे मानले जात आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते, माजी आमदार दिलीप बनकर यांना आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यापुढे ठेऊन पालकमंत्री गिरीष महाजन यांच्यासह विविध नेत्यांनी प्रयत्न सुरु केले आहेत. जिल्हा परिषद निवडणूकीपासून बनकर देखील भाजपच्या जास्तच जवळगेल्याने आगामी काळात निफाडच्या राजकारणात राष्ट्रवादीला झटका देण्यासाठी भाजपची खेळी सुरु आहे. यामध्ये शरद पवार, अजित पवार यांचे निकटवर्तीय असलेल्या बनकरांवर पवारांचा प्रभाव कायम राहतो की भाजप त्यांना जाळ्यात अडकवते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

राज्याच्या सहकार, शेती, अर्थव्यवस्था, समाजकारण व राजकारणावर आपली विशेष छाप पाडलेल्या निफाड मतदारसंघात 1957 पासून कधीही भाजपला संधी तर दुर 2014 चा अपवाद वगळता चार आकडी मतदानही झालेले नाही. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे संस्थापक कर्मवीर काकासाहेब वाघ, महाराष्ट्र राज्य साखर संघाचे अध्यक्ष तात्यासाहेब बोरस्ते, मालोजीराव मोगल, माजी खासदार डॉ. वसंतराव पवार, शेतकरी चळवळीतील माधवराव खंडेराव मोरे, प्रल्हाद पाटील कऱ्हाड, रावसाहेब कमद, माजी राज्यमंत्री विनायकदादा पाटील आदी दिग्गड मंडळीचे नेतृत्व या तालुक्‍याला लाभल्याने गावपातळीपर्यंत शेतीच्या माध्यमातून विकास, राजकीयदृष्ट्या परिपक्व मतदार या तालुक्‍यात आहेत.

बोरस्ते, वाघ यांच्या नात्या गोत्याचा कर्मवीर आणि मालोजीराव मोगल यांच्या गटातच फिरणारे, शरद पवार यांचा प्रभाव असलेले, पिंपळगाव बसवंत हे राजकारणाचे केंद्र पहिल्यांदा (कै) रावसाहेब कदम यांनी ओझरकडे खेचून आनले होते. यामध्ये गेल्या दोन निवडणूकांत दिलीप बनकर यांना मोठा पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेससाठीही बनकर यांच्या विविध मर्यादाही उघड होऊ लागल्या होत्या. असे असले तरीही अजित पवार यांना अद्यापही दिलीप बनकर विश्‍वासू वाटतात. तर पालकमंत्री गिरीष महाजन यांना बनकर जवळचे वाटतात. त्यामुळे तिसऱ्यांदा पक्ष उमेदवारी देतो की नाही या शंकेमुळे बनकर स्वतःच नवीन संधी शोधताहेत अशी चर्चा आहे. त्याच बरोबर भाजपही असहाय्य असल्यान प्रभावी उमेदवार म्हणून त्यांच्यावर जाळे टाकण्यास आसुसलेले आहेत.

गेली दहा वर्षे निफाडचे राजकारण साचले असून त्यात नव्या नेतृत्वाची पोकळी निर्माण झालेली आहे. बदललेले राजकीय संदर्भ, बंद पडलेला निफाड सहकारी साखर कारखाना, उध्वस्त सहकारी चळवळ, द्राक्ष, भाजीपाला उत्पादकांचे प्रश्‍न, शहरीकरण यामध्ये युवा पिढीच्या विविध चळवळी येथे सुरु आहेत. सोशल मिडीयावर त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. कर्जमाफी तसेच अन्य प्रश्‍नामुळे भाजपविषयी मोठी नाराजी वाढली आहे. शिवसेना आमदार अनिल कदम आक्रमक मात्र त्यांचा पक्ष गोंधळलेला असल्याने जिल्हा परिषद सदस्या अमृता पवार यांच्याकडे विधानसभेसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा सांभाव्य चेहरा म्हणून पाहिले जाते. जिल्हा परिषद सदस्य व (कै) रावसाहेब कदम यांचे चिरंजीव यतीन कदम यांनी गटनोंदणीत जिल्हा परिषदेचे सहयोगी सदस्यत्व स्विकारले आहे. त्यामुळे बनकर यांनी भाजपत प्रवेश केल्यास भाजपचा फायदा मात्र बनकरांना त्याचा फटका बसण्याची शक्‍यता अधिक ठरु शकते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com