bjp trying to purchase congress mla in mp
bjp trying to purchase congress mla in mp

आमदार खरेदी करण्याचा भाजपचा डाव कॉंग्रेसने उधळला?

मध्य प्रदेशमधील राजकारण आमदार फोडण्याच्या मुद्द्यावरून आज ढवळून निघाले आहे. कॉंग्रेसचे आमदार फोडण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे, तर भाजपचा आमदार फोडण्याशी आमचा काहीही संबंध नसल्याचा प्रतिवार भाजपने केला आहे.

पुणे - मध्य प्रदेशमधील राजकारण आमदार फोडण्याच्या मुद्द्यावरून आज ढवळून निघाले आहे. कॉंग्रेसचे आमदार फोडण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे, तर आमदार फोडण्याशी आमचा काहीही संबंध नसल्याचा प्रतिवार भाजपने केला आहे. 

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते शिवराजसिंह चौहान आणि कॉंग्रेसचे नेते ज्योतिरादित्य सिंदिया यांनी एकमेकांना सडेतोड उत्तर दिले आहे. 

कॉंग्रेसच्या आमदारांना भाजप खरेदी करण्याचा प्रयत्न करीत असल्याच्या आरोपाला उत्तर देताना शिवराजसिंह चौहान म्हणाले, की प्रश्न कॉंग्रेसच्या घरातील आहे आणि आरोप मात्र आमच्यावर लावत आहेत. आरोप करणे त्यांचे काम आहे. कॉंग्रेसमधील गटबाजीमुळे अंतर्गत धुसफूस टोकाला पोचली आहे.

याला प्रतिउत्तर देताना ज्योतिरादित्य सिंधिया यांनी `आमदार फोडण्याची भाजपची ही जुनीच खोडी आहे. परंतु त्यात त्यांना यश येणार नाही. आम्ही सर्व एक आहोत. मध्य प्रदेश सरकारला कोणताही धोका नाही.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com