BJP & Trinamool congress workers lash in Amit Shah's road show | Sarkarnama

अमित शहांच्या 'रोड शो'त भाजप तृणमूल कार्यकर्त्यात राडा- जाळपोळ 

पीटीआय
मंगळवार, 14 मे 2019


तुमच्याकडे "कंगाल बांगला' हा शब्द वापरण्यासाठी दम होता, आमच्या राज्याचा अवमान करून आपण असेच निघून जाऊ असे तुम्हाला वाटत होते का?
डेरेक ओब्रायन, नेते तृणमूल कॉंग्रेस

 

कोलकाता : भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या   रोड शोत भाजप- तृणमूल कार्यकर्त्यात जबरदस्त राडा झाला .  जाळपोळही  झाली . भाजपचे समर्थक आणि तृणमूल कॉंग्रेस छात्र परिषद व डाव्या संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये अक्षरश: सिनेस्टाइल हाणामारी झाली. या वेळी दोन्ही गटांनी वाहनांची जाळपोळ करत परस्परांवर तुफान दगडफेक केली. दंगेखोर कार्यकर्त्यांना आवरण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला.

अमित शहा यांच्या वाहनांचा ताफा कॉलेज स्ट्रीट मार्गावरून उत्तर कोलकात्यातील स्वामी विवेकानंद यांच्या निवासस्थानाच्या दिशेने जात असताना त्यांच्या दिशेने जोरदार दगडफेक करण्यात आली. अमित शहा ज्या ट्रकवर उभे होते त्या दिशेने काठ्या फेकण्यात आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. कोलकाता विद्यापीठाच्या बाहेर डाव्या आणि तृणमूल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शहांविरोधात घोषणाबाजी करायला सुरवात केल्याने तणावात भर पडली.

 या वेळी काही कार्यकर्त्यांनी शहांना काळे झेंडे दाखवीत "अमित शहा गो बॅक'चे पोस्टर्स झळकावले. पोलिसांनी या कार्यकर्त्यांना तातडीने ताब्यात घेतले. विद्यासागर कॉलेज आणि विद्यापीठ हॉस्टेलबाहेर तृणमूल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शहांच्या ताफ्यांवर दगड फेकताच तणाव निर्माण झाला, यानंतर संतापलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी हॉस्टेलची दारे लावून घेत रस्त्यांवरील वाहनांना आगी लावल्या, या वेळी त्यांनी इमारतीच्या दिशेनेही दगडफेक केली. येथील हॉस्टेलबाहेरील थोर समाजसुधारक ईश्‍वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याचीही भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोडतोड केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख