भाजपने पाच वर्षे जनतेला छळले : विजय वडेट्टीवार

भाजपसह काही नेत्यांना आमचे तीन पक्ष्यांचे सरकार होणार नाही असे वाटत होते. पण आम्ही तीन पक्ष मिळून सरकार बनवत असल्याने भाजपची जीभ त्यांच्याच घशात अटकली आहे. जे अशक्यप्राय होते ते शक्य झाले अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे
Vijay Vadettiwar Criticism on BJP
Vijay Vadettiwar Criticism on BJP

मुंबई : भाजपला बाजूला ठेवणे हाच आमचा कॉमन मिनिमम प्रोग्रॅम होता तो यशस्वी झाला असून भारतीय जनता पक्षाने गेली पाच वर्षे जनतेला छळले. मुळात महाराष्ट्राच्या जनतेत प्रथमच बदल्याची भावना निर्माण झाली त्याचा हा परिपाक आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी दिली.

आमदार वडेट्टीवार म्हणाले, ''भाजपसह काही नेत्यांना आमचे तीन पक्ष्यांचे सरकार होणार नाही असे वाटत होते. पण आम्ही तीन पक्ष मिळून सरकार बनवत असल्याने भाजपची जीभ त्यांच्याच घशात अटकली आहे. जे अशक्यप्राय होते ते शक्य झाले ते केवळ तीन पक्षांनी खोलवर जाऊन दीर्घकाळापासून सातत्याने विचार केला. कोणता विषय,  कोणता मुद्दा आणि आधार घ्यावा याचा विचार करून निर्णय घेतला. तीन पक्ष्यांची विचार करून घेतलेल्या या निर्णयामुळे आम्ही यशस्वी वाटचाल करू.''

''भाजपला बाजूला ठेवणे हाच आमचा कॉमन मिनिमम प्रोग्रॅम आहे. भारतीय जनता पक्षाने गेली पाच वर्षे जनतेला छळले. मुळात महाराष्ट्राच्या राजकारणात आणि जनतेत कधी बदल्याची भावना नव्हती. पण आता ही आली कारण शेतकऱ्यांचे प्रश्न, वाढलेली बेरोजगारी, अनेक प्रलंबित प्रश्न आहेत.भाजपच्या सरकारने महाराष्ट्रावर  पाच लाख कोटीचे कर्ज करून ठेवले आहे. त्यामुळे आम्हाला  श्वेतपत्रिका काढावी लागेल. उपमुख्यमंत्री पदाबाबत काँग्रेसला संधी मिळणार का या प्रश्नावर ते म्हणाले, उद्या उद्धव ठाकरे यांचा शपथविधी पार पडल्यानंतर उपमुख्यमंत्री पदाबाबत सर्वजण एकत्र बसून निर्णय घेतील. त्यामुळे दोन उपमुख्यमंत्री की एकच पाच वर्षे राहणार हे चर्चे नंतर ठरविले जाईल. आम्ही सध्या बिनधास्त असून सर्व काही चांगल्या प्रकारे होईल.'' असेही वडेट्टीवार म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com