BJP is thinking of including some dissidents in cabinet reshuffle ! | Sarkarnama

आउटगोइंग रोखण्यासाठी मंत्रिमंडळ विस्तारात नाराजांना संधी ?

सरकारनामा
बुधवार, 3 ऑक्टोबर 2018

संजय सावकारे,डॉ.विजयकुमार गावीत , राजेंद्र पटणी, मंदा म्हात्रे,अमल महाडिक , किसन कथोरे , स्नेहलता कोल्हे , मोनिका राजळे अशा बाहेंरून आलेल्या नेत्यांना अदयाप काहीही मिळालेले नाही.

मुंबई :  नाना पटोले यांच्या पाठोपाठ ज्येष्ठ कॉंग्रेस नेते माजी प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख यांचे पुत्र आशीष यांनी स्वगृहाचा रस्ता धरल्याने अन्य पक्षातून भाजपमध्ये आलेल्या नेत्यांचे आउट गोईंग रोखण्यासाठी विस्तारात नव्यांना झुकते माप देण्याचा विचार  सुरू आहे.

आपल्या मतदारसंघात ताकद असलेल्या आणि प्रभाव असलेल्या या नेते मंडळींना रोकुन ठेवण्यासाठी मंत्री पद , महामंडळ किंवा तत्सम पद आता तरी दिले जावे असे भाजपमधील इलेक्शन मॅनेजमेंट पाहणाऱ्या एका गटाला वाटते . 

संजय सावकारे,डॉ.विजयकुमार गावीत , राजेंद्र पटणी, मंदा म्हात्रे,अमल महाडिक , किसन कथोरे , स्नेहलता कोल्हे , मोनिका राजळे अशा बाहेंरून आलेल्या नेत्यांना अदयाप काहीही मिळालेले नाही.डॉ.सुनील देमुख आणि प्रशांत ठाकूर वगळता या आमदारांना महामंडळही मिळालेले नाही. 

अकार्यक्षम आणि भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या मंत्र्यांना अर्धचंद्र देण्याचा विचार देखील भाजपमध्ये प्रस्तावाधीन आहे मात्र चार -साडेचार वर्षे सांभाळल्यानंतर  निवडणुका जवळ आलेल्या असताना अर्धचंद्र देऊन पक्षात नाराजांची फौज कशाला वाढवायची असा मतप्रवाह समोर येत आहे . त्यामुळे भ्रष्ट मंत्र्यांना काढणे कितपत शक्‍य आहे असा प्रश्‍न नेत्यांना पडला आहे.

2014 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजपत आलेल्या 20 ते 25 नेत्यांना वेगवेगळी आश्‍वासने देण्यात आली होती. त्यातील काही अपवाद वगळता कुणालाही पद मिळालेले नाही. या नाराजांच्या फौजा आता भाजपसाठी चिंतेचा विषय ठरणार आहेत. 

माजी आमदार कृष्णा हेगडे हे मुंबई कॉंग्रेसमधून भाजपत आले तेंव्हा त्यांनाही आश्‍वासन देण्यात आले होते पण ते प्रत्यक्षात आलेले नाही. अशा परिस्थितीत बदललेल्या वातावरणात नाराजांना समवेत ठेवणे आवश्‍यक मानले जाते आहे. पेट्रोल डिझेल भाववाढ तसेच पूर्ण न झालेली आश्‍वासने या पार्श्‍वभूमीवर या आश्‍वासनांचे स्मरण पुन्हा करून दिले जाईल.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख