राणेंची `एनडीए`तून हकालपट्टी करा : जठार; तर जठार हे पाकिटमार : निलेश राणे

राणेंची `एनडीए`तून हकालपट्टी करा : जठार; तर जठार हे पाकिटमार : निलेश राणे

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा भाजपने एनडीएतून (राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून) खासदार नारायण राणे यांच्या हकालपट्टीची मागणी केल्याने नव्याने वाद उफाळला आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी या मागणीसाठी पुढाकार घेतला. त्यामुळे आता जठार आणि राणे कुटुंबीयांमध्ये शाब्दिक शिमगा सुरू झाला आहे. परिणामी भविष्यात स्वाभिमान आणि भाजप मध्ये तळकोकणात संघर्ष तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना करून राणे एनडीएत सामील झाले. भाजपने देखील त्यांना आपल्या कोट्यातून राज्यसभेची खासदारकी दिली. मात्र सुरुवातीला भाजपची स्तुती करणारे राणे आपल्या पक्षाच्या विश्वास यात्रे दरम्यान भाजप सरकार आणि नेत्यांवरच टीका करताना पहायला मिळाले. 

राणे थेट भाजप नेतृत्वावर आणि सरकारवर टीका करत असल्यामुळे भाजपचे स्थानिक नेते चांगलेच अस्वस्थ झाले. सुरुवातीला भाजप सरचिटणीस राजन तेली आणि आता जिल्हाध्यक्ष प्रमोद जठारांनी राणेंविरोधात मोहीमच उघडली आहे. त्यांनी आपल्या तक्रारीची पक्षाच्या वरिष्ठांनी दखल घेतल्याचे सांगितले आहे. 

नेहमीप्रमाणे राणेंचे दोन्ही पुत्र याचा समाचार घेण्यासाठी मैदानात उतरले. नितेश राणेंनी ट्वीट करत तर स्वाभिमानचे सरचिटणीस निलेश राणे यांनी पातळी सोडून शिवराळ भाषेत टीकेला प्रत्त्युत्तर दिले. तसेच प्रमोद जठार पाकिटमार असल्याची टीका देखील केली आहे. 

स्वाभिमानी पक्ष हा भाजपचा सुरवातीला मित्रपक्ष असल्याने ना इलाजाने का होईना दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना जमवून घेण्याची कसरत करावी लागली होती. आता मात्र  राणेंच्या हकालपट्टीची मागणी झाल्याने तळकोकणात भाजप आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षामध्ये आगामी काळात राजकिय शिमगा आणखी पेटण्याची शक्यता आहे. होण्याची शक्यता आहे
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com