'पक्षाला शिक्षा' करणाऱ्या राजकुमार सिंग यांना भाजपाने केले निलंबित

तदानाच्या एक तास अगोदरच पक्षाने आयात उमेदवार लादला. निष्ठावंतांना उमेदवारी पासून लांब ठेवले असा आरोप करून भाजपाचे परिवहन सदस्य राजकुमार सिंग यांनी मतदान प्रक्रियेतुन पाय काढला होता.
BJP suspends Rajkumarsingh form party
BJP suspends Rajkumarsingh form party

उल्हासनगर : परिवहनचे सदस्य राजकुमार सिंग यांनी परिवहन समिती सभापतीच्या निवडणुकीत मतदान प्रक्रियेतुन पाय काढल्याने भाजपा उमेदवाराचा पराभव झाला.असा ठपका ठेऊन पक्षाचे आमदार तथा जिल्हाध्यक्ष कुमार आयलानी यांनी राजकुमार सिंग यांना पक्षातून निलंबित केले आहे.


परिवहनच्या सदस्य पदा वरुनही उचलबांगडी होणार असून त्यांच्या जागी नव्या सदस्याची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती नगरसेवक मनोज लासी यांनी दिली.


21 तारखेला परिवहन समिती सभापतीची निवडणूक होती. राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेश करणारे शंकर दावानी यांना पक्षाने उमेदवारी दिली होती.त्यामुळे भाजपाचे 6 आणि महाविकास आघाडीचे टीम ओमी कालानी, शिवसेना, रिपाइ यांचे देखील 6 असे समान सदस्य संख्याबळ झाले होते. 


दावानी यांच्या समोर आघाडीचे दिनेश लहरानी होते.त्यात स्थायी समिती सभापती राजेश वधारिया हे भाजपाचेच असल्याने त्यांचे निर्णायक मत हे दावानी यांनाच पडणार असल्याने दावानी यांचा विजय निश्‍चित होता.


मात्र मतदानाच्या एक तास अगोदरच पक्षाने आयात उमेदवार लादला. निष्ठावंतांना उमेदवारी पासून लांब ठेवले असा आरोप करून भाजपाचे परिवहन सदस्य राजकुमार सिंग यांनी मतदान प्रक्रियेतुन पाय काढला होता.


 त्यामुळे शंकर दावानी आणि दिनेश लहरानी यांना प्रत्तेकी 6 मते मिळाली.निवडणूक निर्णय अधिकारी तथा नवीमुंबई उपनगर जिल्हाधिकारी मिलिंद बोरिकर यांनी चिठ्ठी काढली त्यातही भाजपावर नशिब रुसले आणि महाविकास आघाडीचे दिनेश लहरानी हे परिवहन सभापती पदावर विजयी झाले.


राजकुमार सिंग यांनी मतदान केले असते तर विजय हा शंकर दावानी यांचाच होता. मात्र त्यांनी पाय काढल्याने पक्षाला सभापती पदा पासून वंचित राहावे लागले.त्यामुळे आमदार तथा जिल्हाध्यक्ष कुमार आयलानी यांनी राजकुमार सिंग यांना पक्षाने बहाल केलेले उल्हासनगर 1 च्या मंडळ अध्यक्ष पदावरुन निलंबित केले असून त्यांचे परिवहन सदस्य पद देखील रद्द करण्याची प्रक्रिया हाताळली जाणार असल्याचे मनोज लासी यांनी सांगितले.


दरम्यान भाजपातील काही मंडळीच्या कारवायांमुळे पक्ष बदनाम झाला आहे. पक्षाने त्यांच्यावर कोणतीच कारवाई केली नसून राजकुमार सिंग हे उत्तरभारतीय असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याची ओरड समाज माध्यमांवर होऊ लागली आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com