प्रसंगी 'गोकुळ' स्वबळावर लढणार

आज संघाच्या निवडणुकीसाठी नऊ संस्थांचे ठराव दाखल झाले. आजअखेर 141 ठराव दाखल झाले असून 22 जानेवारी हा ठराव दाखल करण्याचा अखेरचा दिवस आहे. 18 जानेवारी रोजी सत्तारूढ गटाचे ठराव नेत्यांकडे एकत्रित सुपुर्द करून नंतर ते सहाय्यक निबंधक (दुग्ध) यांच्याकडे देण्यात येणार आहेत.
gokul election
gokul election

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीत सद्यस्थितीत सत्ताधाऱ्यांसोबत आपण राहू पण त्यांनी सन्मान दिला नाही तर प्रसंगी स्वबळावरही निवडणूक लढवण्याचा निर्णय भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

भाजपाच्या जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीसाठी पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची एक बैठक आज झाली. या निवडीनंतर श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली "गोकुळ' च्या निवडणुकीबाबत बैठक झाली. बैठकीला माजी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार सुरेश हाळवणकर, अमल महाडिक, 'गोकुळ' चे संचालक बाबा देसाई, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शौमिका महाडिक आदि उपस्थित होते.

या बैठकीत तालुकानिहाय "गोकुळ' च्या निवडणुकीचा आढावा घेण्यात आला. त्यात सद्यस्थिती आपण सत्ताधाऱ्यांसोबत जाऊ, त्यांनी आपला सन्मान नाही केला तर प्रसंगी ही निवडणूक स्वबळावर लढवण्याची तयारी ठेवा, असे आवाहन श्री. पाटील यांनी केले. भाजपाने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला तर यश कितपत मिळेल यापेक्षा त्याचा तोटा कोणाला होईल, याचा विचार भाजपासोबत चर्चा करताना सत्ताधाऱ्यांनी करावा, अशीही अपेक्षा या बैठकीत व्यक्त करण्यात आली. ठराव प्रक्रिया संपल्यानंतर या निवडणुकीबाबत अंतिम निर्णय घेण्याचे यावेळी ठरले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com