सत्ता गेली तरीही भाजपमध्ये आयारामांना पायघडया तर निष्टावंतांना रेवडया!

सत्ता संपादन करण्यासाठी भाजपने 2014 पासून इतर पक्षांतील ताकदवर नेत्यांना पक्षात पायघडया अंथरण्यास सुरूवात केली होती. त्यामुळे 2014 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपने कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या प्रमुख पक्षासह अपक्ष आमदार, आजी, माजी लोकप्रतिनिधींना गळाला लावले.
Bjp Giving Importance to Leaders Imported from other Parties like Pravin Darekar
Bjp Giving Importance to Leaders Imported from other Parties like Pravin Darekar

मुंबई : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपदी प्रविण दरेकर यांची निवड झाल्याने राज्यात सत्ता असतानाही आणि नसतानाही भाजपमध्ये आयारामांना पायघडया तर निष्टावंतांना रेवडया देण्याची परंपरा जोमाने सुरू असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे. यामुळे भाजपमधील सच्चा कार्यकर्ता नाराज झाल्याचे सांगण्यात येते.

सत्ता संपादन करण्यासाठी भाजपने 2014 पासून इतर पक्षांतील ताकदवर नेत्यांना पक्षात पायघडया अंथरण्यास  सुरूवात केली होती. त्यामुळे 2014 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपने कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या प्रमुख पक्षासह अपक्ष आमदार, आजी, माजी लोकप्रतिनिधींना गळाला लावले. 2014 प्रमाणे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 'मेगाभरती'च्या नावाखाली कॉंग्रेस, राष्ट्रवादीतून अनेक नेत्यांना आयात केले. राष्ट्रवादी पक्षाला तर भाजपने खिंडार पाडले. 

भाजपने अनेक राजकीय घराणे आपल्याकडे वळवली होती. या घराण्यातील ताकदवर नेत्यांबरोबर त्यांच्या चेल्याचपाटयांना तसेच या नेत्यांच्या मुलांचादेखील प्रवेश भाजपने करून टाकला होता. त्यामुळे भाजप हा पक्ष 'मुले पळवणारी टोळी' अशी टीका विरोधी पक्षांकडून केली जात होती. भाजपच्या या रणनितीमुळे पक्षातील निष्टावान आणि सच्चा कार्यकर्त्यांवर मात्र अन्याय झाल्याची भावना पक्षात पसरली होती. राज्यात सत्ता असतानाही आयारामांवर मेहरनजर दाखवली जात होती. त्यानंतर2019 च्या विधानसभा निवडणुकीत आयारामांना तिकिटे देण्यासाठी राज पुरोहित सारख्या निष्टावान नेत्याचे तिकीट कापले होते.

मात्र राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर भाजपला विरोधी बाकावर बसावे लागले. सत्ता गेल्यानंतरही भाजपने विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता म्हणून शिवसेना-मनसे असा प्रवास करून आलेले प्रविण दरेकर यांची निवड केली. दरेकर यांच्या निवडीने पुन्हा एकदा भाजपच्या निष्टावान कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याची भावना पक्षात बोलून दाखवली जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com