BJP state level meet on 26 in Chinchwad | Sarkarnama

येत्या २६ एप्रिलला भाजपची राज्यस्तरीय बैठक चिंचवडमध्ये

तुषार खरात
गुरुवार, 20 एप्रिल 2017

शेतक-यांना कर्जमाफी देण्याच्या मागणीसाठी विरोधकांनी चांगलेच वातावरण ढवळून काढले आहे. विरोधकांच्या संघर्ष यात्रेला व आसूड यात्रेला शेतक-यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील भाजपच्या आमदारांवरही जनतेचा दबाव वाढत आहे. त्यामुले चिंचवडच्या बैठकीत कर्जमाफीच्या अनुषंगानेही चर्चा होईल.

मुंबई: भारतीय जनता पक्षाची राज्यस्तरीय बैठक येत्या २६ व २७ एप्रिल रोजी चिंचवड येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी भाजपाचे सर्व मंत्री, खासदार, आमदार नवनिर्वाचित महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष व पदाधिकारी असे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

पक्षाची कार्यकारिणीची बैठक नुकतीच पार पडली होती. या बैठकीतील महत्त्वाच्या विषयांच्या अनुषंगाने चिंचवडमधील बैठकीत विस्तृत चर्चा केली जाईल, असे भाजपाचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले.

सध्या देशात व राज्यात भाजपाला अनुकूल वातावरण आहे. या वातावरणाचा अचूक घेऊन फायदा घेत भाजपाला तळागाळात पोचविण्याच्या प्रयत्न करायला हवेत.  संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करणे, राज्यात ज्या ठिकाणी अजून पक्ष कमकुवत आहे तिथे लक्ष देणे अशा मुद्द्यांवर या बैठकीमध्ये चर्चा होईल, असे अन्य सूत्रांनी सांगितले.

शेतक-यांना कर्जमाफी देण्याच्या मागणीसाठी विरोधकांनी चांगलेच वातावरण ढवळून काढले आहे. विरोधकांच्या संघर्ष यात्रेला व आसूड यात्रेला शेतक-यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील भाजपच्या आमदारांवरही जनतेचा दबाव वाढत आहे. त्यामुले चिंचवडच्या बैठकीत कर्जमाफीच्या अनुषंगानेही चर्चा होईल, असे सूत्रांनी सांगितले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख