कर्नाटकच्या सत्ता संघर्षात येडियुरप्पांनी दुसऱ्यांदा मैदान सोडले

Kumarswamy-Yediyurappa
Kumarswamy-Yediyurappa

बंगरुळू :  कर्नाटकच्या सत्ता संघर्षात भाजप नेते येडियुरप्पा यांनी सलग दुसऱ्यांदा विश्‍वासदर्शक ठरावाच्या वेळी मैदान सोडले आहे. 

आज कुमारस्वामी यांच्या विश्‍वासदर्शक ठरावाच्या वेळी येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या 104 आमदारांनी सभात्याग केला. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी अशी मागणी करीत येडियुरप्पा यांनी भाषण संपविले आणि सभात्याग केला. त्यामुळे कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेस-जेडीएस सरकारवरचा विश्‍वासदर्शक ठराव अविरोध संमत झाला आहे. 

चार दिवसांपूर्वी येडियुरप्पा यांना आपल्या सरकारवर विश्‍वासदर्शक ठरावाला सामोरे जायचे होते. त्यावेळीही सभागृहात शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर भावनाप्रधान भाषण करून येडियुरप्पांनी विश्‍वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्याऐवजी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे कर्नाटक विधानसभेत शक्तीप्रदर्शनाची वेळ येताच भाजपने माघार घेण्याची ही दुसरी वेळ आहे. 

दरम्यान आज विधानसभेचे कामकाज सुरू झाल्यावर भाजपने सभापतिपदाची निवडणूकही लढविली नाही त्यामुळे "कॉंग्रेस-जेडीएस'आघाडीचे रमेश कुमार यांची बिनविरोध निवड झाली. 

भाजपला आपल्या 104 आमदारांपैकी काही मते फुटू नयेत, अशी भीती असावी म्हणून त्यांनी मतदानात सहभाग टाळला असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com