#ResultsWithSarkarnama विदर्भात भाजप-शिवसेना आघाडीवर

विदर्भात भाजप-शिवसेना युतीने आघाडी घेतली आहे. नागपूर, अकोला, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूरमध्ये भाजप, तर अमरावती, यवतमाळ, बुलडाणा मतदारसंघामध्ये शिवसेना आघाडीवर आहे.
#ResultsWithSarkarnama विदर्भात भाजप-शिवसेना आघाडीवर

नागपूर - विदर्भात भाजप-शिवसेना युतीने आघाडी घेतली आहे. नागपूर, अकोला, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूरमध्ये भाजप, तर   अमरावती, यवतमाळ, बुलडाणा मतदारसंघामध्ये शिवसेना आघाडीवर आहे.    

नागपुरात नितीन गडकरी आघाडीवर
नागपूर : पहिल्या फेरीत भाजपचे नितीन गडकरी यांनी 15622 मतांनी आघाडी घेतली आहे. 

वर्ध्यात रामदास तडस आघाडीवर 
वर्धा : मिळालेली मते - रामदास तडस (भाजप) 23015,  चारुलता टोकस (काँग्रेस) 15199, धनराज वंजारी (वंचित) 1176
 

अमरावतीत शिवसेनेचे अडसूळ आघाडीवर

अमरावती - तिसऱ्या फेरीत मिळालेली मते : आनंदराव अडसूळ शिवसेना 67340, नवनीत राणा अपक्ष 63109, गुणवंत देवपरे वंचित बहुजन आघाडी 9341, अरुण वानखडे बसप - 179

अकोल्यात भाजपचे संजय धोत्रे आघाडीवर
अकोला - अकोल्यात भाजपचे संजय धोत्रे आघाडीवर आहेत. मिळालेली मते -  संजय धोत्रे (भाजपा) - ५७०३७, प्रकाश आंबेडकर (वंचित) - ३४४५३, हिदायत पटेल (काँग्रेस)- २७०२५

यवतमाळ वाशीम पहिल्या फेरीत भावना गवळींची आघाडी
यवतमाळ वाशीम - पहिल्या फेरीत शिवसेनेच्या भावना गवळींनी आघाडी घेतली आहे. मिळालेली मते - भावना गवळी(शिवसेना)- 17778, माणिकराव ठाकरे (काँग्रेस)-14147
, प्रवीण पवार (वंचित बहुजन आघाडी) - 3662, वैशाली येडे (प्रहार जनशक्ती पक्ष) - 1981

भंडारा गोंदियात भाजपचे मेंढे आघाडीवर
भंडारा गोंदिया - भंडारा गोंदियात भाजपचे सुनील मेंढे पहिल्या फेरीत आघाडीवर आहेत. मिळालेली मते :  सुनील मेंढे (भाजप)-25082,  नाना पंचबुद्धे(राष्ट्रवादी)-17670, विजया नांदूरकर ( बसपा) - 1595, के. एन. नान्हे(वंचित बहुजन आघाडी)-819

गडचिरोली चिमूरमध्ये अशोक नेते आघाडीवर 

गडचिरोली-चिमूर - गडचिरोली चिमूरमध्ये चौथ्या फेरीत भाजपचे अशोक नेते यांनी 7 हजार 302 मतांनी आघाडी घेतली आहे. 

बुलडाण्यात शिवसेनेचे प्रतापराव जाधव आघाडीवर
बुलडाणा- दुसऱ्या फेरी अखेर शिवसेनेचे प्रतापराव जाधव आघाडीवर आहेत. मिळालेली मते - प्रतापराव जाधव (शिवसेना) 29540, डॉ. राजेंद्र शिंगणे(राष्ट्रवादी)-21014 , बळीराम सिरस्कार (वंचित बहुजन आघाडी)-8427

चंद्रपुरात हंसराज अहीर आघाडीवर
चंद्रपूर : भाजपचे हंसराज अहीर आघाडीवर आहेत. मिळालेली मते- भाजप-हंसराज अहीर : 10679,  काँग्रेस- बाळू धानोरकर : 8734, वंचित - राजेंद्र महाडोळे : 1259

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com