आगामी निवडणुकीत युती न झाल्यास भाजपमध्ये इन्कमिंग वाढणार

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात शिवसेना-भाजप युतीने जोरदार कामगिरी करत आठ पैकी सात लोकसभेच्या जागा जिंकल्या. औरंगाबाद वगळता युतीने मराठवाड्यात आपले वर्चस्व सिद्ध केले. परंतु मंत्रिमंडळ विस्तारावरुन शिवसेना-भाजपमध्ये सुरू झालेली वादावादी, शिवसेनेने पुन्हा आयोध्या वारी करत भाजपला दिलेले आव्हान या पार्श्वभूमीवर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत युती होणार की नाही अशी चर्चा सुरू झाली आहे.
आगामी निवडणुकीत युती न झाल्यास भाजपमध्ये इन्कमिंग वाढणार

औरंगाबाद : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात शिवसेना-भाजप युतीने जोरदार कामगिरी करत आठ पैकी सात लोकसभेच्या जागा जिंकल्या. औरंगाबाद वगळता युतीने मराठवाड्यात आपले वर्चस्व सिद्ध केले. परंतु मंत्रिमंडळ विस्तारावरुन शिवसेना-भाजपमध्ये सुरू झालेली वादावादी, शिवसेनेने पुन्हा आयोध्या वारी करत भाजपला दिलेले आव्हान या पार्श्वभूमीवर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत युती होणार की नाही अशी चर्चा सुरू झाली आहे. 

युती न झाल्यास याचा फटका शिवसेनेलाच अधिक बसण्याची शक्यता आहे. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आयात केलेल्या तसेच विधान परिषदेवर निवडून आलेल्या नेत्यांना मंत्रिपद दिल्यामुळे पक्षात मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. अशावेळी ऐन निवडणुकीत युती फिसकटली तर शिवसेनेमधून भाजपमध्ये जाणाऱ्या नाराज आमदारांची संख्या वाढू शकते.  

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात भाजपने 23 तर शिवसेनेने 18 खासदार निवडून आणत गेल्या निवडणुकीतील संख्याबळ राखले. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीचे कडवे आव्हान असतानाही युतीने आपली व्होट बँक शाबूत असल्याचे दाखवून दिले होते .

राज्य व केंद्र सरकारच्या विरोधात प्रचंड दारुगोळा वापरून देखील मतदारांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला स्वीकारले नाही. त्यातच वंचित बहुजन आघाडी ने दलित मुस्लिम कॉम्बिनेशन करत आघाडीच्या अडचणी अधिकच वाढवल्या.

मराठवाड्याचा विचार केला तर गेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपकडे प्रत्येकी तीन तर काँग्रेसकडे दोन लोकसभा मतदारसंघ होते. मोदी लाटेत नांदेड आणि हिंगोलीची जागा जिंकत काँग्रेसने आपला प्रभाव दाखवून दिला होता. 2019 मध्ये मात्र सुप्त मोदी लाटेत काँग्रेस आघाडी अक्षरशः वाहून गेली.

मराठवाड्यातील आठ पैकी लातूर, बीड, जालना, परभणी आणि नांदेड या चार जागा भाजपने तर उस्मानाबाद, हिंगोली आणि परभणी या तीन जागा शिवसेनेने जिंकल्या. आश्चर्यकारक निकाल औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात लागला.
तीस वर्षापासून सत्तेत असलेल्या शिवसेनेला इथे एमआयएम - वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराकडून पराभवाची धूळ चाखावी लागली .

वेट अँड वॉच
केंद्रात जुन्याच अवजड उद्योगमंत्री या खात्यावर शिवसेनेची बोळवण करण्यात आली आहे. लोकसभा उपाध्यक्ष पदावर दावा सांगितला तर मोदी शहा जोडीने वायएसआर रेड्डीच्या काँग्रेसला जवळ करत उपाध्यक्ष पदाची ऑफर दिली.
शिवसेनेचे खच्चीकरण करण्याचा हा प्रकार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या काही पचनी पडला नाही. त्यामुळे शिवसेनेने आपल्या अठरा खासदारांना घेऊन पुन्हा चलो अयोध्याची हाक दिली. आज 18 खासदारांसह अयोध्येतील रामलल्लाचे दर्शन घेऊन शिवसेनेने भाजपाला डिवचले आहे.

या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा मुख्यमंत्री कुणाचा?मोठा भाऊ छोटा भाऊ हे वाद चव्हाट्यावर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. लोकसभेनंतर विधानसभा निवडणूक एकत्रितपणे लढण्याच्या आणाभाका दोन्ही पक्षांनी खाल्या असल्या तरी ऐनवेळी युतीचे तीन-तेरा वाजू शकतात हे लक्षात घेता मराठवाड्यातील शिवसेनेच्या अनेक इच्छुकांनी भाजपचा पर्याय राखून ठेवल्याची चर्चा आहे. 

सध्या काँग्रेस राष्ट्रवादीसह अनेक छोट्यामोठ्या पक्षांचा भाजपकडे असलेला ओढा पाहता युती तुटली तर मराठवाड्यातील अनेक विद्यमान तसेच इच्छुक उमेदवार भाजपचे कमळ हातात घेण्याचीची दाट शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com