फारुख अब्दुलांच्या मुलीला 370 रद्द झाल्याने मिळेल न्याय:   डॉ. पात्रा

फारुख अब्दुलांच्या मुलीला 370 रद्द झाल्याने मिळेल न्याय:   डॉ. पात्रा

सोलापूर  : आरएसएस आणि भाजप हे दहशतवादाचे प्रशिक्षण देत असल्याचे उद्‌गार तत्कालीन गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी काढले होते. त्यांच्या याच वक्तव्याचा आधार पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी संयुक्त राष्ट्राच्या महासभेत घेतला.

देशाला देशभक्ती शिकविणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत जन्मलेल्या गृहमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे देशाची आणि महाराष्ट्राची जागतिक पातळीवर नाचक्की झाली आहे.

सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापूरची आणि महाराष्ट्राची माफी मागावी असे आवाहन भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ता डॉ. संबित पात्रा यांनी केले आहे. शिंदे यांनी माफी मागितली नाही तर सोनिया गांधी यांनी शिंदे यांना त्याबाबत सूचना द्याव्यात अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. 

हुतात्मा स्मृती मंदिरात आज सायंकाळी झालेल्या युवा व प्रज्ञावंत संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. कलम 370 हटविल्यानंतर निर्माण झालेल्या शंकाचे निरासन करण्यासाठी हा संवाद कार्यक्रम झाला. यावेळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकारमंत्री सुभाष देशमुख, खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर शिवाचार्य महास्वामी, भाजपचे राज्य सचिव राजेश पांडे, महापौर शोभा बनशेट्टी, जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांची उपस्थिती होती.


 डॉ. पात्रा म्हणाले, कलम 370 हे दलित विरोधी, आदिवासी विरोधी आणि महिला विरोधी ही होते. ओमर अब्दुला यांच्या मातोश्री ब्रिटिशीयन असतानाही इतर महिलांना न मिळाणारे काश्‍मीरचे त्यांना मिळाले. पर प्रांतातील महिलेपासून झालेल्या मुलाला जे अधिकार नाहीत ते अधिकार ओमर अब्दुला यांना मिळाले आणि मुख्यमंत्रीही झाले.

फारुख अब्दुला यांच्या मुलीने परराज्यातील मुलासोबत लग्न केल्याने त्यांच्या अधिकारावर गदा आली आहे. आम्ही अब्दुला यांच्या मुलीसह सर्वच कश्‍मिरवासियांना न्याय देऊ असा विश्‍वासही डॉ. पात्रा यांनी व्यक्त केला. 

 संविधानातील कलम 370 हटविल्याने देशाला एक झेंडा, एक संविधान आणि एक प्रधानमंत्री मिळाला. अजित पवार यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीत दोन झेंडे, दोन देते आणि दोन कायदे तयार झाले होते. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीतील कलम 370 रद्द करून राष्ट्रवादीला एक झेंडा, एक नेता आणि एक कायदा दिल्याचा टोला डॉ. पात्रा यांनी लावला.

पवारांनी राष्ट्रवादीतील कलम 370 हटविण्यासाठी पुढाकार घेतला मग देशासाठी असलेल्या संविधानातील कलम 370 हटविण्यासाठी का पुढाकार घेतला नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. 

डॉ. पात्रा यांनी मांडला कश्‍मिरचा हिशेब 

2004 ते 2019 पर्यंत कश्‍मिराला दिले 4 लाख दोन हजार कोटी रुपये 

* 2011-12 मध्ये प्रत्येक कश्‍मिरींवर झाले 1500 हजार रुपये खर्च

 * 2011-12 मध्ये प्रत्येक भारतीयांवर झाले 3 हजार 800 रुपये खर्च

 * 2018-19 मध्ये प्रत्येक कश्‍मिरींवर झाले 28 हजार रुपये खर्च 

* 2018-19 मध्ये प्रत्येक भारतीयांवर झाले 7 हजार 566 रुपये खर्च

 लालू अन्‌ बिल क्‍लिंटन, मोदी अन्‌ ट्रम्प

 अमेरिकेचे पंतप्रधान बिल क्‍लिंटन भारताच्या दौऱ्यावर आल्यानंतर लालूप्रसाद यादव यांच्यासह अनेक नेते क्‍लिंटन यांचा स्पर्श आपल्याला व्हावा यासाठी प्रयत्न करत होते.

हाऊडी मोदी कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या हाताला धरून त्यांनी अमेरिकेच्या नागरिकांना ट्रंप यांची ओळख करून दिली.

त्यावेळी अमेरिकेचे अनेक खासदार मोदींसोबत सेल्फी काढण्यासाठी धडपडत होते. भारतीयांसाठी हा अभिमानाचा क्षण असल्याचेही डॉ. पात्रा यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com