BJP spokesperson Madhav Bhandari advises shivsena to introspect | Sarkarnama

जैन मुनींवर राग काढण्यापेक्षा लोकांनी का नाकारले याचा विचार करा - माधव भंडारी  

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

मुंबई : " राज्याच्या 2014 च्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवापासून शिवसेनेची अपयशाची मालिका चालू असून मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीतील शिवसेनेचा पराभव ही त्या मालिकेतीलच पुढची कडी आहे. लोक आपल्याला सातत्याने का झिडकारतात, याची कारणे शोधण्याच्या ऐवजी शिवसेनेने आपल्या पराभवाचा राग एका जैन मुनीवर काढणे हा रडीचा डाव आहे", असे प्रत्युत्तर भारतीय जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांनी संजय राऊत यांना बुधवारी दिले.

 ते म्हणाले की, "सर्वसंगपरित्याग करून पूर्णवेळ समाजासाठी काम करणाऱ्या आदरणीय मुनींवर आगपाखड करणाऱ्या शिवसेनेला हिंदुत्वाचा वारसा सांगायचा काहीही नैतिक अधिकार नाही. नयनपद्मसागर मुनींची तूलना दहशतवादी कारवायातील आरोपी असलेल्या एका धार्मिक प्रवचनकाराशी करणे ही शिवसेनेची वैचारिक दिवाळखोरी आहे."

श्री . भंडारी पुढे म्हणाले  ,"  राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार उत्तम काम करत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात झालेल्या प्रत्येक महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत भाजपाची ताकद वाढली आहे. जनतेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला पुनःपुन्हा पसंती दिल्यामुळे भाजपाला यश मिळत आहे. ही शिवसेनेची खरी पोटदुखी आहे". 

चोरटे आणि भुरटे यांचा पराभव - शेलार 
"मी संजय राउत यांची मनस्थिती समजू शकतो. ज्यावेळेस पराभव होतो. जनता नाकारते तेव्हा बावचाळलेली मनस्थिती असते.भाजपाची भुमिका स्पष्ट आहे.आम्ही सर्व समाजातील लोकांना सोबत घेतले आहे. आणि आम्ही जिंकलो याचा आम्हाला अभिमान आहे. त्यामुळे प्रश्‍न "मनी' आणि मुनीचा नसून चोरटे आणि भुरटे यांचा आहे, "टोला भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी हाणला आहे.

" मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत आपल्याला थोडेसेच यश मिळाले आणि भाजपाला मात्र लोकांनी संपूर्ण यश दिले याबद्दल शिवसेनेला वाईट वाटणे आश्‍चर्यकारक आहे. उगाच जैन मुनींवर आगपाखड करून जनादेशाचा अपमान करण्यापेक्षा जनतेचा आदर केला तर शिवसेनेचे राजकारणात काही तरी स्थान उरेल', असेही श्री. शेलार म्हणाले . 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख