भाजपमध्ये काही 'चौकीदार', काही 'बेखबर' ! 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभियानाला प्रारंभ केल्यानंतर पक्षातील मोठे नेते, लोकप्रतिनिधी, महत्त्वांच्या पदांवर असलेले नेते किती तत्परतेने त्याला प्रतिसाद देत आहेत, यावर वॉच ठेवण्यासाठी पक्षश्रेष्ठींनी स्वतंत्र यंत्रणा नेमल्याचे सूत्रांकडून कळते
भाजपमध्ये काही 'चौकीदार', काही 'बेखबर' ! 

नागपूर  : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मै भी चौकीदार' या अभियानाचा बिगूल वाजविल्यानंतर देशभरातून भाजप व चाहत्यांनी आपल्या ट्‌विटर अकाऊंटच्या नावापुढे "चौकीदार' लावले. अवघ्या दोन दिवसांत सोशल मिडियावरील या अभियानाचे मोठ्या प्रमाणात स्वागत झाले आणि त्यावर ट्रोलिंगही झाले. नागपूर शहर भाजपचे काही नेतेदेखील 'चौकीदार' झाले, मात्र अद्याप काही नेते या अभियानापासून अनभिज्ञ आहेत. 

नरेंद्र मोदी यांनी अभियानाची घोषणा केल्यावर काहीच तासांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते व भुपृष्ठ वाहतुक मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर, राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या ट्विटर अकाऊंटचे नाव बदलले होते. तर टप्प्याटप्प्याने भाजपचे स्थानिक आमदार आणि नेत्यांच्या ट्‌विटर अकाऊंटलाही हा बदल बघायला मिळाला. 

यात विशेषत्वाने महापौर नंदा जिचकार, आमदार सुधाकर कोहळे, आमदार कृष्णा खोपडे, आमदार विकास कुंभारे, लघु उद्योग विकास महामंडळाचे अध्यक्ष संदीप जोशी, नवनितसिंह तुली, यांचा समावेश होतो. यातील काही नेते नियमित ट्‌विटरचा वापर करत नसले तरीही नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर त्यांच्या नावापुढे "चौकीदार' लागलेले बघायला मिळाले. 

तर काही नेते नियमित ट्विट करणारे असले तरीही या अभियानापासून अद्याप ते बेखबर असल्याचे जाणवले. राज्यभरात भाजपचे कार्यकर्ते आणि नेते ज्याप्रमाणात "चौकीदार' अभियान फॉलो करताना दिसत आहेत, त्याप्रमाणात नागपूरमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी अद्याप तरी फारसे गांभिर्याने घेतलेले नाही, असे चित्र आहे. भाजपच्या या पक्षांतर्गत अध्यादेशाची अंमलबजावणी करण्यात मुंबई व पुण्याच्या तुलनेत नागपूर पिछाडीवर आहे. त्याचे पक्षांतर्गत परिणाम व दुष्परिणाम काय असतील, हे मात्र अद्याप स्पष्ट नाही. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभियानाला प्रारंभ केल्यानंतर पक्षातील मोठे नेते, लोकप्रतिनिधी, महत्त्वांच्या पदांवर असलेले नेते किती तत्परतेने त्याला प्रतिसाद देत आहेत, यावर वॉच ठेवण्यासाठी पक्षश्रेष्ठींनी स्वतंत्र यंत्रणा नेमल्याचे सूत्रांकडून कळते. हे अभियान फॉलो न केल्याने भाजपच्या जोरावर 'दिग्गज' ठरलेल्या मंडळींवर पक्षाकडून जाब विचारला जाऊ शकतो, यालाही सूत्रांनी दुजोरा दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com