bjp with shivsena will win 200 seats : Chandrkant Patil | Sarkarnama

भाजप शिवसेनेला सोबत घेऊन २०० जागा जिंकणार : चंद्रकांत पाटलांचा दावा

राजेंद्रकृष्ण कापसे
बुधवार, 12 सप्टेंबर 2018

खडकवासला : भाजप व शिवसेनेच्या सरकारने मोठ्या प्रमाणावर विकास कामे केली आहेत. त्यामुळे आमचेच सरकार पुन्हा येईल अशी  भीती दोन्ही काँग्रेसला वाटत आहे.  त्यामुळे आमच्या विरुद्ध त्यांना एकत्र येऊन आमच्या विरुद्ध लढावे लागणार आहे. लागत आहे. हा आमचा विजय आहे. त्यामुळे हिंम्मत असेल तर दोन्ही काँग्रेसने वेगवेगळे लढावे." असे आव्हान राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे. 

खडकवासला : भाजप व शिवसेनेच्या सरकारने मोठ्या प्रमाणावर विकास कामे केली आहेत. त्यामुळे आमचेच सरकार पुन्हा येईल अशी  भीती दोन्ही काँग्रेसला वाटत आहे.  त्यामुळे आमच्या विरुद्ध त्यांना एकत्र येऊन आमच्या विरुद्ध लढावे लागणार आहे. लागत आहे. हा आमचा विजय आहे. त्यामुळे हिंम्मत असेल तर दोन्ही काँग्रेसने वेगवेगळे लढावे." असे आव्हान राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे. 

खडकवासला मतदारसंघातील रस्त्याच्या कामाच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत पालकमंत्री गिरीश बापट, आमदार भीमराव तापकीर, आमदार बाळा भेगडे उपस्थित होते. 

भाजप शिवसेनेला बरोबर घेऊन राज्याच्या विधानसभा निवडणुकीत 200पेक्षा जास्त जागा जिंकू. असा विश्वास व्यक्त करीत बांधकाम मंत्री पाटील म्हणाले, विकास कमी मोठ्या प्रमानात झाल्याने तसेच रस्त्याच्या कामाचा मोठा वेग पाहून दोन्ही काँग्रेसला भीती वाटते. दोन्ही काँग्रेस वेगवेगळे लढल्यावर विधानसभेच्या सध्या असलेल्या 80 जागा 40 पर्यंत जागा कमी होतील. म्हणून त्यांनी अफवा पसरविण्यास सुरुवात केली आहे, असा आरोप त्यांनी केला. 

राष्ट्रीय महामार्ग टोल मुक्त नाहीत. परंतु त्यातून मिळणाऱ्या रक्कमेतून राज्यातील राष्ट्रीय महामार्ग केले जातात. राज्याचे मालकीचे महामार्ग म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभाग व एमएसआरडीसीच्या रस्ते
कार व मोटारीसाठी यापूर्वीच टोलमुक्त केले आहे, असे त्यांनी सांगितले.

खड्डे का पडतात, याचा अभ्यास काॅंग्रेस-राष्ट्रवादीने केलेला नाही. त्यांना रस्त्याला देण्यासाठी जास्त निधी नव्हता. चांगले रस्ते करण्यास वेळ लागणार आहे. मागील 15वर्षात तुम्ही रस्त्याची कामे केली नाहीत परिणामी रस्त्याला खड्डे पडले. त्यात तुम्ही सेल्फी काढताय, असा टोला विरोधकांना लगावला.

जीएसटीमधुन 43 हजार कोटी, महसूल विभागाच्या स्टॅम्प ड्युटी मधून 21 हजार कोटी रुपयांचे उद्दिष्ट होते. ते 26 हजार कोटी मिळाले आहे. म्हणजे पाच हजार कोटी रुपयांनी निधी वाढला आहे. 

भाजप- शिवसेनेचे सरकारने कामे केली आहेत. हे लोकांना माहिती आहे. त्याची जाणीव आहे. म्हणून आता झालेल्या महापालिकेच्या निवडणुकित सांगली जळगाव पालिकेवर भाजपचा झेंडा फडकला. विरोधकांना माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटीलची सांगली वाचविता आली नाही.  ती महापालिका भाजपच्या ताब्यात आली. 2019ला पुन्हा आपलीच सत्ता येणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विरोधकांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी आतापासून देव पाण्यात ठेवले आहे.

 
खडकवासला  मतदारसंघाला जास्तीचा निधी मिळवून दिल्याबद्दल भाजप मतदारसंघाच्या वतीने अध्यक्ष अरुण राजवाडे व त्याचा सहकाऱ्यांनी चंद्रकांत पाटील, गिरीश बापट, भीमराव तापकीर यांचा या वेळी सत्कार केला.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख