शिवसेना-भाजप : सत्तासंघर्षही मैत्री इतकाच जुना !

शिवसेना भाजपमधील हा सत्तासंघर्ष नवीन नसून या सत्तासंघर्षाला जुने संदर्भ कारणीभूत असल्याचे राजकीय विश्‍लेषकांच म्हणणे आहे.
devendra_uddhav_
devendra_uddhav_

मुंबई : राज्यात सत्ता संघर्ष जोरात पेटला आहे. मुख्यमंत्रिपदासह सत्तेतील समसमान वाट्यावर शिवसेना अडून बसली आहे, तर भाजप काही केल्या मुख्यमंत्रिपद सोडायला तयार नाही. समान विचारधारा असणारे हे दोन मोठे पक्ष एकमेकांविरोधात उभे टाकल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. मात्र शिवसेना भाजपमधील हा सत्तासंघर्ष नवीन नसून या सत्तासंघर्षाला जुने संदर्भ कारणीभूत असल्याचे राजकीय विश्‍लेषकांच म्हणणे आहे.


2014 मध्ये शिवसेना-भाजपमध्ये जागावाटपावरून युती तुटली आणि शिवसेना-भाजपचा पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला. सत्तास्थापनेच्या वेळेला शिवसेना विरोधी बाकावर बसली आणि भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांची साथ घेत बहुमत सिद्ध करत सत्ता मिळवली. 


शिवसेनेला सात कॅबिनेट आणि सहा राज्यमंत्री पदांवर समजूत काढण्याचा प्रयत्न केला आणि सत्तेत सामावून घेतले. मात्र आता चित्र पालटले आहे. आता पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपचा सत्तासंघर्ष मुख्यमंत्रिपद आणि सत्तेतील समसमान वाटप यावरून सुरू झाला असला, तरी या वेळी शिवसेनेचे पारडे जड असल्याने त्यांनी भाजपची कोंडी केली आहे.


शिवसेना-भाजपमधला संघर्ष प्रत्येक सत्तावाटपाच्या वेळेस उभा राहतो. याचे मागचे जुने काही संदर्भ आहेत. 1995 मध्ये जेव्हा पहिल्यांदा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या झंझावातामुळे महाराष्ट्रामध्ये शिवसेना-भाजप युतीचे सरकार आले, त्या वेळेलाही आपल्या पदरात जास्ती खाती पडावीत आणि महत्त्वाची खाती आपल्याकडे राहावीत म्हणून भाजपचे तत्कालीन दोन महत्त्वाचे नेते प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे अडून बसले होते.

त्यांनी शरद पवारांना मध्यस्थी करायला लावून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या मनात असलेला मुख्यमंत्री सुधीर जोशी यांना बदलायला लावला. मनोहर जोशी यांच्याकडे मुख्यमंत्रिपद सोपवायला लावले. 


1995 मध्ये जेव्हा सत्ता आली, त्या वेळेस शरद पवार यांना मध्यस्थी करायला लावून महत्त्वाची सगळी खाती महाजन यांनी भाजपकडे ठेवली. त्यात उपमुख्यमंत्री, गृहमंत्री होते, ऊर्जामंत्री पदही भाजप खेचण्यात यशस्वी झाली होती. भाजपचे आणि महाजनांचे हट्ट त्या वेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेने पुरवले होते. शिवाजी पार्कवर जवळपास एक महिन्याच्या कालावधीनंतर शपथविधीचा सोहळा पार पडला.

शिवसेना- भाजप सरकार साडेचार वर्षे महाराष्ट्रात सत्तेत राहिले. 1999 मध्ये जेव्हा भाजप - शिवसेनेला बहुमत मिळाले नाही त्या वेळेस भाजपने बाळासाहेब ठाकरेंकडे मुख्यमंत्रिपद भाजपला देण्याचा हट्ट केला होता. त्या वेळी गोपीनाथ मुंडे यांना मुख्यमंत्री करा, तरच समर्थन देऊ अशी भूमिका भाजपने घेत प्रसंगी राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊन सत्ता स्थापन करू, अशी धमकी शिवसेनेला दिली होती. 


यामुळे 1999 मध्ये भाजपच्या या धमकीमुळे शिवसेनेला आमदारांसह काही अपक्ष आमदारांची पळवापळवीही करावी लागली होती. मात्र भाजपने मुख्यमंत्रिपदाचा हट्ट कायम धरल्याने शिवसेनेच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आणि विलासराव देशमुख कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नेतृत्वात मुख्यमंत्रिपदावर बसले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com