भाजपचा शिवसेनेला प्रेमाचा नजराणा : राज्यातील समीकरणे पुन्हा बदलणार?

मुंबई महापालिकेत शिवसेनेला `फ्री हॅंड`
भाजपचा शिवसेनेला प्रेमाचा नजराणा : राज्यातील समीकरणे पुन्हा बदलणार?

मुंबई : भाजपने शिवसेनेला प्रेमाचा नजराणा पाठविला असून मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीत आपला उमेदवार उभा करणार नसल्याचे जाहीर करून भाजपने सेनेला सुखद धक्का दिला आहे.

राज्यात सत्तास्थापनेचा तिढा अद्याप सुरु असताना, महापौरपदांच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुरू झाला आहे. त्यातून अनेक नवीन समीकरणे उदयास येत आहेत. मुंबई महापलिकेत भाजप आणि शिवसेनेचे जवळपास समान संख्याबळ असल्याने येथे काय होणार, याची उत्सुकता आहे. त्यात भाजपने माघार घेऊन सेनेला मुक्त मार्ग करून दिला आहे. 

आवश्यक नगरसेवक संख्याबळ भाजपकडे नसल्याने निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती भाजप खासदार मनोज कोटक यांनी जाहीर केले. असे असले तरी 2022 मध्ये मुंबईत भाजपचा महापौर असेल, असा दावाही त्यांनी केला. याशिवाय भाजप आमदार आशिष शेलार यांनीही आपण तुल्यबळ आहोत मात्र आमच्याकडे संख्याबळ नाही. त्यामुळे विरोधी विचारांच्या जीवावर अभद्रता करणार नाही, असं ट्विट केलं आहे.

शिवसेनेकडून महापौरपदासाठी सध्याचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांचं नाव जवळपास निश्चित आहे. पण ‘मातोश्री’ नेहमी ऐनवेळी नाव बदलत असते, त्यामुळे जोपर्यंत नावावर अधिकृत शिक्कामोर्तब होत नाही, तोपर्यंत नाव निश्चित मानलं जात नाही.

मुंबईतील पक्षीय बलाबल

शिवसेना – 94
भारतीय जनता पार्टी – 83
काँग्रेस – 29
राष्ट्रवादी काँग्रेस – 8
समाजवादी पार्टी – 6
एमआयएम – 2
मनसे – 1
अभासे – 1
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com