सफाई ठेक्‍यावरून जळगावात भाजप-सेना नगरसेवकांची महासभेत चकमक 

जळगाव महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे, तर शिवसेना विरोधी पक्ष आहे. महापौर सीमा भोळे यांच्या अध्यक्षतेखाली आज महासभा आयोजित करण्यात आली होती. व्यासपीठावर उपमहापौर डॉ.अश्‍वीन सोनवणे, आयुक्त उदय टेकाळे, नगरसचिव सुनील गोराणे होते. शहरातील कचरा उचलण्याचा ठेका नुकताच वॉटरग्रेस कंपनीला देण्यात आला आहे. मात्र या कंपनीच्या कामाबाबत जनतेच्या तक्रारी आहेत.
BJP Sena Corporators Quarrel in Jalgaon Corporation
BJP Sena Corporators Quarrel in Jalgaon Corporation

जळगाव  : महापालिकेने वॉटर ग्रेस कंपनीला शहरातील सफाईचा ठेका दिला आहे. मात्र, ही कंपनी चांगले काम करीत नसल्याचा आरोप करीत शिवसेनेने हा ठेका रद्द करण्याची मागणी केली. तर सत्ताधारी भाजपच्या सदस्यांनी त्यांना एक संधी दयावी असे मत व्यक्त केले त्यावेळी दोन्ही पक्षाच्या सदस्यांमध्ये चागलीच शाब्दीक चकमक उडाली, अगदी एकमेकांच्या अंगावर धावूनही गेले. त्यामुळे सभागृहात गोंधळ उडाला. 

जळगाव महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे, तर शिवसेना विरोधी पक्ष आहे. महापौर सीमा भोळे यांच्या अध्यक्षतेखाली आज महासभा आयोजित करण्यात आली होती. व्यासपीठावर उपमहापौर डॉ.अश्‍वीन सोनवणे, आयुक्त उदय टेकाळे, नगरसचिव सुनील गोराणे होते. शहरातील कचरा उचलण्याचा ठेका नुकताच वॉटरग्रेस कंपनीला देण्यात आला आहे. मात्र या कंपनीच्या कामाबाबत जनतेच्या तक्रारी आहेत. शहरात कोठेही कचरा उचलण्याचे काम व्यवस्थित होत नाही अशा तक्रार करीत विरोधी पक्ष शिवसेनेने हा ठेका रद्द करावा व ठेकेदरास काळ्या यादीत टाकावे अशी लक्ष्यवेधी सदस्य नितीन लढ्ढा यांनी मांडली. 

मात्र, सत्ताधारी भाजपचे सदस्य कैलास सोनवणे यांनी त्याचा हा दावा फेटाळून लावला. तो नवीन असल्याने त्यांना आणखी काही दिवस संधी देण्यात यावी अशी मागणी केली. त्यावेळी शिवसेनेच्या सदस्य विष्णू भंगाळे यांनी धुळे येथे याच कंपनीतर्फे कशी बोगसगिरी करण्यात आली होती, व ती तेथील प्रशासनाने कशी उघडकीस आणली याबाबत 'सकाळ'वृत्तपत्रातील बातमीच सभागृहात दाखविली. तर शिवसेनेचे नगरसेवक प्रशांत नाईक यांनी गाडीचे वजन वाढविण्यासाठी मक्तेदार दगडगोटे, माती भरीत असल्याचा व्हीडीओ दोन दिवसापूर्वीच व्हायरल करण्यात आला होता. त्याची माहितीही शिवसेना सदस्यांनी सभागृहात देत ठेका रद्द करण्याची मागणी केली. 

मात्र भाजप सदस्यांनी नकार दिल्याने त्यावर दोन्ही गटात जोरदार शाब्दीक चकमक झाली. याच वेळी शिवसेना सदस्य अमर जैन व भाजपचे सभागृह नेते भगत बालाणी यांच्यातही जागेवर बसण्यावरून जोरदार वाद झाले ते सुध्दा एकमेकांच्या अंगावर धावून गेले. उपस्थित सदस्यांनी हा वाद सोडविला. मात्र, यावेळी सभागृहात एकच गोंधळ उडाला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com