bjp sena | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

पाण्याच्या पळवापळवीने नाशिक भाजप- सेनेत ठिणगी

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 15 एप्रिल 2017

नाशिक : भाजपचे नेते नाशिकचे पाणी मराठवाड्यात पळवितात हा आरोप तसा जुना नाही. मात्र महापालिकेत स्वबळावर सत्ता स्थापन केलेल्या भाजपकडून प्रभागाप्रभागातील पाणी देखील पळवले जातेय हा नवा आरोप आज झाला. तो देखील शिवसेनेकडून. त्यामुळे नाशिक शहरात पाण्यावरुन भाजप- शिवसेनेत नवा राजकीय वाद तापण्याची चिन्हे आहेत. 

नाशिक : भाजपचे नेते नाशिकचे पाणी मराठवाड्यात पळवितात हा आरोप तसा जुना नाही. मात्र महापालिकेत स्वबळावर सत्ता स्थापन केलेल्या भाजपकडून प्रभागाप्रभागातील पाणी देखील पळवले जातेय हा नवा आरोप आज झाला. तो देखील शिवसेनेकडून. त्यामुळे नाशिक शहरात पाण्यावरुन भाजप- शिवसेनेत नवा राजकीय वाद तापण्याची चिन्हे आहेत. 

महापालिकेच्या जलकुंभासहित पाणी पुरवठ्याच्या साधनांवर सुरक्षा रक्षक नियुक्त करण्याच्या विषयाने आज झालेल्या महासभेत अचानक कलाटणी घेत शहरातील पाणी टंचाईवर थांबला. जुने नाशिक मध्ये दोन वेळ पाणी येत असताना सत्ताधारी पक्षाकडून मुद्दामहून एकवेळ पाणी पुरवठा केला जात असल्याचा आरोप अपक्ष नगरसेवक मुशील सैय्यद यांनी आरोप करून भाजपला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला तर दुसरीकडे सिडकोतील शिवसेनेच्या नगरसेविका किरण गामणे यांनी सातपूर मधील भाजपचे नगरसेवक पाणी पळवित असल्याचा आरोप करून खळबळ उडवून दिल्याने साध्या विषयाने पहिल्याचं महासभेत गंभीर वळण घेतले. 

शहरात अतिरेक्‍यांकडून जैविक धोका असल्याने महापालिकेचे पाणी उपसा केंद्र, जलशुद्धीकरण केंद्र, बूस्टर पंपिंग वर खासगी सुरक्षा रक्षक नियुक्त करण्याच्या शासन व पोलिसांच्या पत्राच्या आधारे महासभेत प्रस्ताव सादर करण्यात आला. त्यावर मुशीर सैय्यद यांनी सुरक्षा रक्षकांचा विषय सोडून जुने नाशिक मध्ये जाणून बुजून एकवेळ पाणी पुरवठा केला जात असल्याचा आरोप केला. पाणी पुरवठा विभागाकडून एकवेळ पाणी होत असल्याची कबुली देण्यात आली परंतु दोनदा पाणी पुरवठा केल्यास विस्कळित पणा वाढेल असा सल्ला दिला परंतू सैय्यद यांनी मागील पंचवार्षिकचा संदर्भ देत त्यावेळी दोनदा पाणी पुरवठा होत होता परंतू आता धरणात मुबलक पाणी असूनही एकवेळ पाणी पुरवठा होत असल्याने नाराजी व्यक्त केली व सत्ताधारी भाजप जाणून बुजून जुने नाशिकवर अन्याय करत असल्याचा आरोप केला. सभात्याग करताना सैय्यद यांनी सुरळीत पाणी पुरवठा न झाल्यास पुढील महासभेत पिठासनासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला. पाण्याच्या मुद्यावरून सिडकोतील नगरसेविका किरण गामणे यांनी सातपूरचे भाजपचे नगरसेवक पाणी पळवीत असल्याचा आरोप करून खळबळ उडवून दिली. सत्ताधारी भाजपवर हीच का पारदर्शकता असा खोचक सवाल करून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. विरोधकांकडून किरण यांना पाठिंबा मिळतं असताना भाजपचे नगरसेवक दिनकर पाटील आक्रमक होत आरोप फेटाळून लावला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख