गुजरातमध्ये आयोगाने फटकारताच 'पप्पू'चा बनला 'युवराज'!

प्रचारासाठीच्या जाहिरातींमध्ये काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना उद्देशून 'पप्पू' हा शब्द वापरण्यास गुजरातमध्ये निवडणूक आयोगाने भाजपला मनाई केल्यानंतर भाजपने 'युवराज' हा शब्द वापरायला तत्काळ सुरूवात केली.
गुजरातमध्ये आयोगाने फटकारताच 'पप्पू'चा बनला 'युवराज'!

अहमदाबाद : प्रचारासाठीच्या जाहिरातींमध्ये काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना उद्देशून 'पप्पू' हा शब्द वापरण्यास गुजरातमध्ये निवडणूक आयोगाने भाजपला मनाई केल्यानंतर भाजपने 'युवराज' हा शब्द वापरायला तत्काळ सुरूवात केली.

राहुल यांना लक्ष्य करण्याच्या उद्देशाने सोशल मीडियावर भारतीय जनता पक्षाच्या समर्थकांकडून "पप्पू' हा शब्द मोठ्या प्रमाणात वापरला जात आहे. जाहिरातीच्या मजकुरातील कोणताही शब्द एखाद्या व्यक्तीला उद्देशून वापरलेला नसल्याचा दावा भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपच्या वतीने मागील महिन्यात जाहिरातीची संहिता मान्यतेसाठी निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आली होती. त्यामधील "पप्पू' हा शब्द मानहानीकारक असल्याचे सांगत राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नेतृत्वाखालील प्रसारमाध्यम समितीने याला आक्षेप घेतला होता. आयोगाने मनाई करताच भाजपने राहुल यांच्यासाठी "युवराज' हा शब्द उपरोधिक अर्थाने वापरायला सुरवात केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com