BJP rejected by people : Rajeev Satav | Sarkarnama

काँग्रेसमुक्त भारताचे स्वप्न पाहणाऱ्या भाजपाला चपराक : राजीव सातव

मंगेश शेवाळकर
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

हिंगोली :  " राजस्थान, छत्तीसगड व मध्यप्रदेशात काँग्रेसने चांगलीच मुसंडी मारली आहे. काँग्रेसमुक्त भारताचे  स्वप्न पाहणाऱ्या  भाजपाचा या निकालाच्या माध्यमातून मतदारांनी दिलेली चपराक आहे ,"अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे गुजरात राज्याचे प्रभारी तथा हिंगोलीचे खासदार  राजीव सातव यांनी व्यक्त केली आहे. 

हिंगोली :  " राजस्थान, छत्तीसगड व मध्यप्रदेशात काँग्रेसने चांगलीच मुसंडी मारली आहे. काँग्रेसमुक्त भारताचे  स्वप्न पाहणाऱ्या  भाजपाचा या निकालाच्या माध्यमातून मतदारांनी दिलेली चपराक आहे ,"अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे गुजरात राज्याचे प्रभारी तथा हिंगोलीचे खासदार  राजीव सातव यांनी व्यक्त केली आहे. 

खासदार सातव पुढे म्हणाले ,"केंद्रातील सरकारने मागील साडेचार वर्षात केवळ जनतेला आश्वासने दिली आहे. सत्तेवर येण्यापुर्वी निवडणुकीच्या वेळी दिलेल्या आश्वासनाचा या सरकारला विसर पडला होता. केंद्रातील सरकार सर्वच आघाड्यांवर सपशेल अपयशी ठरले आहे. शेतकरी विरोधी धोरणे या सरकारने राबवली आहेत. जनतेच्या मनात सरकार विरुध्द असंतोष निर्माण होत असतांनाही दुसरीकडे भाजपा सरकार मात्र काँग्रेसमुक्त भारताचे स्वप्न पाहात होता. मात्र त्यांच्या भ्रमाचा भोपळा या निवडणुकीने फुटला आहे. "

आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसलाच बहुमत मिळेल असे सांगून खासदार सातव म्हणाले ,"आगामी निवडणुकीची सेमीफायनल समजल्या जाणाऱ्या मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान या राज्यात काँग्रेसला मिळालेले यश युपीएच्या अध्यक्षा सोनीया गांधी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राहूल गांधी यांच्यावर जनतेने टाकलेला विश्वास आहे. "

"खासदार राहूल गांधी यांनी पक्षाची सुत्रे हाती घेतल्यानंतर निवडणुकीसाठी अवलंबलेली रणनिती तसेच काम करणाऱ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना दिलेली संधी यामुळे हे यश मिळाले आहे. आगामी निवडणुकीत काँग्रेस व मित्र पक्ष एकत्रीतपणे पुर्ण ताकदीनिशी मैदानात उतरणार आहे. सन २०१९ मधे काँग्रेस व मित्र पक्षाचेच सरकार स्थापन होणार आहे ,"असेही खासदार सातव यांनी सांगितले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख