भाजप बंडखोर महेश बालदी यांचा आमदार होताच भाजपला पाठिंबा

मी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत होतो आणि पुढेही राहणार आहे.- महेश बालदी, आमदार, उरण विधानसभा
Mahesh-Baldi
Mahesh-Baldi

उरण : उरण विधानसभा मतदारसंघातून युतीचे अधिकृत उमेदवार आमदार मनोहर भोईर यांच्याविरोधात बंड करून निवडून आलेले अपक्ष उमेदवार महेश बालदी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार स्थापन करण्यास पाठिंबा दिला आहे. महेश बालदी यांनी राज्यपालांची भेट घेऊन तसे लेखी पत्र दिले.

उरण विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे विद्यमान आमदार आणि महायुतीचे उमेदवार मनोहर भोईर यांच्याविरोधात भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश बालदी यांनी बंडखोरी केली. तिकीट मिळविण्याचे प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर बालदी यांनी स्वबळावर लढाई लढण्याचा निर्णय घेतला.

अपक्ष निवडणूक लढविणाऱ्या महेश बालदी यांच्यासोबत उरण विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी बालदी यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. एकहाती सत्ता असलेले उरण नगरपरिषदेतील भाजपचे नगरसेवक, भाजपचे सर्व पदाधिकारी बंडखोर उमेदवाराचा प्रचार करीत होते.

राज्यात युती असतानाही महेश बालदी हे निवडणूक लढविण्यावर ठाम राहिले. निशाणी शिट्टीचा प्रचार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप नेते माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या फोटोंचा त्यांनी जाहीर वापर केला.

त्यावेळी भाजपने महेश बालदी यांच्याशिवाय कोणाही भाजप पदाधिकाऱ्यांवर कारवाई केली नाही. त्यामुळे विजयी झाल्यानंतर मी भाजप सोबतच असेन, असा विश्वास ते मतदारांना प्रचारात देत होते. प्रत्यक्षात देखील तेच घडले. महेश बालदी यांनी दोन दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंह कोशारी यांची भेट घेऊन आपण देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत असल्याचे लेखी पत्र दिले व भाजपला पाठिंबा असल्याचे जाहीर केले. 

निवडणुकीत तिकीट मिळाले नाही, म्हणून अपक्ष निवडणूक लढवावी लागली. नागरिकांनी मला विजयी केल्यामुळे माझ्या पक्षाच्या पाठीशी उभे राहणे हे माझे कर्तव्य आहे. म्हणून मी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत होतो आणि पुढेही राहणार आहे.
- महेश बालदी, आमदार, उरण विधानसभा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com