रोहित पवारांच्या रिक्त जागेवर भाजप टक्कर देण्याच्या तयारीत

....
rohit pawar-balasaheb gavade
rohit pawar-balasaheb gavade

शिर्सुफळ :  बारामती तालुक्यातील शिर्सुफळ - गुणवडी जिल्हा परिषद गटाला निवडणुकीचे वेध लागले आहेत. रोहित पवार यांनी या गटातून जिल्हा परिषद निवडणुक लढविल्याने हा गट चर्चेत आला होता.परंतु विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी कर्जत- जामखेड मतदार संघातून आमदारकीची निवडणुक लढवित यश मिळविले.यामुळे शिर्सुफळ- गुणवडी जिल्हा परिषद गटाचे सदस्य पद रद्द झाले आहे. यामुळे लवकरच या गटाची पोटनिवडणूक जाहीर होणार आहे. यासाठी जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत.  

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची काटेवाडी व भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब गावडे यांची पारवडी या गावांचा समावेश असलेल्या बारामती तालुक्यात राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा समजला जाणारा शिर्सुफळ - गुणवडी जिल्हा परिषद गट आहे. हा गट सर्वसाधारणसाठी आहे. या मतदार संघातून रोहित पवारांनी सर्वाधिक मतांनी विजय मिळवला होता. त्यावेळी रोहित पवारांना उमेदवारी देत राष्ट्रवादी पक्षाने विरोधकांना चितपट केले होते. 

मात्र येणाऱ्या पोट निवडणुकीमध्ये गटातील जातीय गणिते पाहता राष्ट्रवादी कॉँग्रेस व भाजपमध्ये 'काँटे की टक्कर' होणार असल्याचे दिसून येत आहे. 38 हजार 348 मतदारांचा समावेश असलेला शिर्सुफळ - गुणवडी हा जिल्हा परिषद गट आहे. यामध्ये एकुण पंधरा गावांचा समावेश आहे.यापैकी शिर्सुफळ पंचायत समिती गणामधील दहा गावांतील 18 हजार 723 मतदारांचा समावेश आहे. तर गुणवडी या पंचायत समितीच्या गणातील पाच गावांमधील 19 हजार 625 मतदरांचा समावेश आहे. या गटातील पंचायत समितीच्या शिर्सुफळ गणामध्ये राष्ट्रवादीच्या लिलाबाई गावडे, तर गुणवडी गणातुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच भारत गावडे प्रतिनिधित्व करीत आहेत.

मागील निवडणुकीमध्ये रोहित पवार उमेदवार असल्याने विरोधकांचा करिष्मा चालला नाही. यामुळे पोट निवडणुकीमध्ये विरोधक कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.

विकासकामाच्या जोरावर विजय निश्चित- संभाजी होळकर (तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस बारामती)
शिर्सुफळ - गुणवडी जिल्हा परिषद गटांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रियाताई सुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार, व तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांच्या माध्यमातुन मोठ्या प्रमाणावर विकासकामे करण्यात आली आहे.या कामांच्या बळावर या गटांमध्ये होणाऱ्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय निश्चित आहे. 

भाजप संपूर्ण ताकद लावणार - प्रविण आटोळे (तालुकाध्यक्ष भारतीय जनता पक्ष बारामती)
शिर्सुफळ गुणवडी गट हा पक्षाचा बालेकिल्ला आहे. मागील निवडणुकीमध्ये काही तांत्रिक अडचणींमुळे ऐनवेळी उमेदवार बदलला होता. मात्र  या पोटनिवडणुकीमध्ये पक्ष संपूर्ण ताकद लावणार आहे.यानुरुप या मतदार भाजप विजय मिळवेल, असा विश्वास आहे.

गटातील गावे व मतदार संख्या.

शिर्सुफळ - 3955, साबळेवाडी - 1387, पारवडी - 3908, सिध्देश्वर निंबोडी - 1704, गाडीखेल - 763, कटफळ - 2044, जैनकवाडी - 867, वंजारवाडी - 1459, सावळ - 1706, रुई - 930, गुणवडी - 6113, पिंपळी लिमटेक - 3457, कन्हेरी - 824, काटेवाडी - 5530, मळद - 3746 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com