Bjp Raosaheb Danve Bailpola | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

रावसाहेब दानवेंनी सपत्नीक केली बैलांची पूजा

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

शेतकऱ्यांची उपजिविका असलेल्या बैलांचा योग्य मान, सन्मान या सणानिमित्त संपुर्ण राज्यभरात केला जातो. आमच्या गावात देखील बैलपोळा उत्साहात साजरा होतो. बैल हा शेतकऱ्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा प्राणी आहे, त्याच्यावरच आमची उपजिविका आहे, म्हणून पोळ्याच्या दिवशी बैल जोडीचा योग्य सन्मान आम्ही करत असतो - रावसाहेब दानवे

औरंगाबाद : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आज (ता. 21) आपल्या जवखेडा येथील गावात पोळा सणानिमित्त बैल जोडीची सपत्नीक पूजा केली. 'बैल हा शेतकऱ्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा प्राणी आहे, त्याच्यावरच आमची उपजिविका आहे, म्हणून पोळ्याच्या दिवशी बैल जोडीचा योग्य सन्मान आम्ही करत असतो,' अशी प्रतिक्रिया रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केली.

राज्यभरात आज बैलपोळ्याचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांचे शेती व जनावरांवरील प्रेम सर्वश्रुत आहे. त्यामुळे पोळ्यासाठी रावसाहेब दानवे कालच मुंबईहून भोकरदनमध्ये दाखल झाले होते. पोळ्याच्या दिवशी दानवे पत्नी निर्मला यांच्यासह बैलजोडीची पूजा करतात. सायंकाळी जवखेडा या गावात दानवे यांनी झूल, घुंगरमाळा, झिरमिळ्या आणि विविध रंगांनी सजवलेल्या बैलजोडीचा कासरा हातात धरला. प्रसारमाध्यमांशी बोलतांना, आपण पोळ्याच्या दिवशी न चूकता बैल पोळ्याला गावात येत असतो, आणि बैलजोडीची पूजा करत असतो हे आर्वजून सांगितले. शेतकऱ्यांची उपजिविका असलेल्या बैलांचा योग्य मान, सन्मान या सणानिमित्त संपुर्ण राज्यभरात केला जातो. आमच्या गावात देखील बैलपोळा उत्साहात साजरा होतो असे दानवे म्हणाले. मुळचे शेतकरी असलेल्या रावसाहेब दानवे यांची औत, नांगर हाकतानाची अनेक छायाचित्रे सोशल मिडियावर व्हायरल झालेली आहेत. महिनाभरापुर्वीच शेतात गाईच्या गोऱ्ह्याचे दात मोजतांनाचे त्यांचे छायाचित्र व्हायरल झाले होते. त्यामुळे दानवे पोळा कसा साजरा करतात याकडे प्रसारमाध्यमांचे लक्ष लागले होते.

सरकारनामाच्या अन्य बातम्या :

मंत्रिपद आणि 'रामभक्त' चंद्रकांतदादा

सरपंचपदाच्या उमेदवारांसाठी प्रचाराची नवीन खर्च मर्यादा जाहीर 

"हर बोला महादेव' चा गजर करीत आमदार शर्मांनी धरला ठेका

अनिल शिरोळे, दिलीप गांधी, हेमंत गोडसे "मौनी खासदार' 

काहींच्या 'मी'पणामुळे काँग्रेसची पिछेहाट : महाडीकांची फटकेबाजी

राणे समर्थकांना राजकारणात काय मिळणार?

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख