BJP President Amit Shah Welcomes Rammandir Verdict | Sarkarnama

अमित शहा यांच्याकडून राममंदिर निर्णयाचे स्वागत

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

श्रीराम मंदीर जन्मभूमीबद्दल सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचे मी स्वागत करतो. सर्व समाजाने व सर्व धर्मियांनी या निर्णय स्वीकारावा आणि एक भारत-श्रेष्ठ भारत ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी कटीबद्ध व्हावे, अशी प्रतिक्रिया भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केली आहे. 

नवी दिल्ली : श्रीराम मंदीर जन्मभूमीबद्दल सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचे मी स्वागत करतो. सर्व समाजाने व सर्व धर्मियांनी या निर्णय स्वीकारावा आणि एक भारत-श्रेष्ठ भारत ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी कटीबद्ध व्हावे, अशी प्रतिक्रिया भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केली आहे. 

गेली कित्येक वर्षे सुरु असलेल्या या विवादावर अखेर आज अंतीम तोडगा निघाला आहे. मी भारताची न्याययंत्रणा व सर्व न्यायमूर्तींचे अभिनंदन करतो. ज्यांनी ज्यांनी या विवाद सोडविण्यासाठी गेली अनेक वर्षे कष्ट घेतले त्या संस्था, संत समाज व लाखो अज्ञात व्यक्तींबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला हा निर्णय ऐतिहासिक ठरेल व तो भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासातला मैलाचा दगड बनेल, याचा मला विश्वास आहे. या निर्णयामुळे भारताची एकता, अखंडता आणि महान संस्कृतीला नवे बळ प्राप्त होईल," असेही अमित शहा यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख