भाजपचे राज्यात मुदतपूर्व निवडणुकांच्या तयारीचे कार्यकर्त्याना आदेश?

धुळे येथे राज्याचे पर्यटन, अन्न व औषध प्रशासन, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी मार्गदर्शन करतांना कार्यकर्त्यांना मध्यावधी निवडणूकासाठी तयार राहण्याचे आदेश दिले.
Electronin Votin Machine
Electronin Votin Machine

धुळे : राज्यात भाजप व शिवसेनेत सत्तास्थापण्यापूर्वी मुख्यमंत्री पद व मलईदार मंत्रिपदांवरून रस्सीखेच सुरू आहे. हा तिढा सुटत नसताना राज्यात मध्यावधी निवडणुकांचे संकेत भाजपच्या गोटातून दिली जात आहे.राज्याचे पर्यटन, अन्न व औषध प्रशासन, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्याची सायंकाळनंतर आढावा बैठक घेतली. त्यात मध्यावधी निवडणुकीसाठी भाजपला स्वबळावर तयारी करण्याचे निर्देश कार्यंकर्त्यांना दिले गेले. याला भाजपचे धुळे शहर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांनीही दुजोरा दिला. निवडणुकीत मोठे यश मिळवून राज्यात पुन्हा देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करणार आहोत, असेही त्यानीं स्पष्ट केले.

धुळे येथे राज्याचे पर्यटन, अन्न व औषध प्रशासन, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी मार्गदर्शन करतांना कार्यकर्त्यांना मध्यावधी निवडणूकासाठी तयार राहण्याचे आदेश दिले. धुळे जिल्ह्यातील पाच आहेत. त्यापैकी चार जागा भाजप लढली होती. मात्र केवळ दोन जागावरच पक्षाला यश मिळाले. साक्री आणि धुळे ग्रामीणच्या जागेवर पराभव झाला. आता पाचही जागा जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांनी तयारी करावी असे निर्देही त्यांनी दिले. 

साक्री व धुळे ग्रामीणमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकीनंतर जे मतदान झाले त्यात आणखी 5 ते 10 हजार मते जमविण्यासाठी रणनीती ठरविली गेली. याबाबत जयकुमार रावल यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले की, धुळे जिल्ह्यात भाजपला चारही जागेवर यश मिळण्याची अपेक्षा होती, परंतु, आम्हाला केवळ दोनच जागेवर यश मिळाले आहे. यावेळी भाजपतर्फे पाच जागा लढविण्यात येतील आणि पाचही जागावर यश मिळविण्यात येईल. त्या दृष्टीने पक्षाच्या कार्यकर्ते तयारीला लागले आहेत.

भाजपचे धुळे शहर- जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी मंत्री रावल यांच्याकडून मध्यावधी निवडणुकीबाबत संकेत दिले गेल्याचे त्यांनी सांगितले, ते म्हणाले, "पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी आम्हाला मध्यवधी विधानसभा निवडणूकीसाठी तयारीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आम्ही तयारीला लागलो आहोत. जिल्ह्यातील पाचही जागा आम्ही निवडून आणून देवेंद्र फडणसवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री करणारच आहोत.''
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com