BJP politics | Sarkarnama

सुब्रमण्यम स्वामींचा जेटलींवर वार 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 2 एप्रिल 2017

भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार सुब्रमण्यम स्वामी पुन्हा एकदा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. अर्थमंत्री जेटली यांनी नोटाबंदीनंतरची स्थिती व जीएसटी विधेयकावर योग्यप्रकारे चर्चा घडवून आणली नसल्याचा दावा स्वामी यांनी केला आहे. 

नागपूर : भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार सुब्रमण्यम स्वामी पुन्हा एकदा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. अर्थमंत्री जेटली यांनी नोटाबंदीनंतरची स्थिती व जीएसटी विधेयकावर योग्यप्रकारे चर्चा घडवून आणली नसल्याचा दावा स्वामी यांनी केला आहे. 

खासदार स्वामी एका कार्यक्रमासाठी नागपुरात आले होते. जेटली यांचे टीकाकार म्हणून स्वामी ओळखले जातात. जेटलींच्या एकूण कारभारावर ते टीकास्त्र सोडतात. नागपुरातील कार्यक्रमात त्यांनी जेटलींच्या कारभारावर पुन्हा टीका केली. नोटाबंदीनंतर उद्भवलेली परिस्थिती हाताळण्यात जेटलींच्या मंत्रालयाला यश आले नाही. लोकांना होणाऱ्या त्रासाची पूर्वकल्पना अर्थ मंत्रालयाला यायला हवी होती. त्यामुळे अनेक अध्यादेश वारंवार जारी करावे लागले. यातून या अर्थमंत्रालयातील कारभार स्पष्ट झाला. 

वस्तू व सेवा कराबाबतही (जीएसटी) अर्थमंत्र्यांनी योग्य तयारी केली नाही. त्यामुळे राज्यसभेत या विधेयकाला विरोध होणार आहे. सध्याच्या स्थितीतील जीएसटी विधेयकाबाबत आपण समाधानी नसल्याचे स्वामी यांनी स्पष्ट केले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख