पदयात्रा केल्या की नाही ? भाजपने मागितला खासदारांना अहवाल  

महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आदेशानुसार केलेल्या पदयात्रांचे अहवाल भाजपने आपल्या खासदारांकडून मागवले होते. मात्र, केवळ २५० खासदारांनीच अद्यापर्यंत हे अहवाल पाठवले आहेत
BJP Asks MPs to Submit Report of Their Tours
BJP Asks MPs to Submit Report of Their Tours

नवी दिल्ली :  महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आदेशानुसार केलेल्या पदयात्रांचा सविस्तर अहवाल आठवडाभरात देण्याच्या सूचना भाजप खासदारांना देण्यात आल्या आहेत. भाजप संसदीय पक्षाची बैठक आज झाली. त्यात वरील सूचना देण्यात आली.

सूत्रांच्या माहितीनुसार भाजपच्या सुमारे केवळ 250 खासदारांनीच याबाबतचे अहवाल केंद्रीय नेतृत्वाकडे पाठविले असून अनेक अहवाल त्रोटक आहेत. संसदीय ग्रंथालय इमारतीत झालेल्या या अधिवेशनाच्या पहिल्या बैठकीस पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित नव्हते. पक्षाध्यक्ष अमित शहा , कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्रा, संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्यासह सत्तारूढ मंत्री व खासदार हजर होते.

या बैठकीत अर्थसंकल्पी व हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान पंतप्रधानांनी केलेल्या विदेश दौऱ्यांचा तपशील खासदारांसमोर सांगण्यात आला. त्यातील कोणता भाग मतदारसंघांत प्रचारासाठी वापरायचा हेही सूचकपणे सांगितले गेल्याचे कळते. मोदींनी दुसऱ्यांदा सत्तेवर विराजमान झाल्यावर विश्वभ्रमणाचा पुढील अध्याय सुरू केला आहे. मागच्या दोन महिन्यात अमेरिकेतील हाऊडी मोदी कार्यक्रमासह अनेक जागतिक मंचांवर त्यांनी हजेरी लावली. विदेशमंत्री एस जयशंकर यांनी इंग्रजीत या भेटींचा लेखाजोखा आज मांडला.

व्यापार कराराबाबतच्या आरसीईपी जाहीरनाम्यातून भारताने काढता पाय घेतला तो केवळ राष्ट्रहितासाठी, याचीही मांडणी वाणिज्यमंत्री पियूष गोयल यांनी या बैठकीत केली. या बैठकीनंतर बोलताना पक्षसूत्रांनी गांधीजींच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या यात्रांबाबतच्या सूचनेची माहिती दिली. पंतप्रधानांच्या आदेशानुसार भाजप खासदार, आमदार, केंद्र व राज्यांचे मंत्री व पदाधिकारी यांनी 2 ते 31 ऑक्‍टोबर या काळात प्रत्येकी 150 किमीच्या पदयात्रा पूर्ण करण्याचे नियोजन होते.

या यात्रांचा विस्तृत अहवाल संसद अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापर्यंत दिल्लीला पाठवा असाही सूचना होत्या. मात्र पक्षाच्या साऱ्या खासदारांनीही त्या पूर्ण पाळलेल्या नसल्याचे दिसून आले. कारण लवकरात लवकर हे अहवाल पाठवा अशी सक्त सूचना आजच्या बैठकीत खासदारांना दिली गेल्याची माहिती आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com