सेनेने रद्द केलेला 'अथांग सावरकर' कार्यक्रम आयोजिला भाजपाने

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावरील अभिनेते शरद पोंक्षे यांचा 'अथांग सावरकर' कार्यक्रम शिवसेनेने काही कारणाने रद्द केला. हीच संधी साधत हाच कार्यक्रम भाजपाचे ठाणे शहरात आयोजित करुन सेनेवर 'सांस्कृतिक कुरघोडी' केली
Niranjay Davkhare Organised program cancelled by Shivsena
Niranjay Davkhare Organised program cancelled by Shivsena

ठाणे : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावरील अभिनेते शरद पोंक्षे यांचा 'अथांग सावरकर' कार्यक्रम शिवसेनेने काही कारणाने रद्द केला. हीच संधी साधत हाच कार्यक्रम भाजपाचे ठाणे शहरात आयोजित करुन सेनेवर 'सांस्कृतिक कुरघोडी' केली असून या प्रकरणाच्या केंद्रस्थानी आहेत भाजाप ठाणे शहराध्यक्ष आमदार निरंजन डावखरे. २७ फेब्रुवारी रोजी हा कार्यक्रम ठाण्यात होत असून भाजपाचे सर्व प्रमुख पदाधिकारी, सावरकर प्रेमी व सामान्य ठाणेकर या कार्यक्रमाला उपस्थित राहतील यासाठी भाजपाने आता कंबर कसली आहे.

शिवसेनाप्रणित स्थानिय लोकाधिकार समिती महासंघाने प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यगृहात 'अथांग सावरकर' कार्यक्रमाचे आयोजन दि.२७ रोजी केले होते. मात्र, महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची मनोरंजनात्मक कार्यक्रमाची इच्छा असल्यामुळे शिवसेनेने कार्यक्रम रद्द केला असे बोलले गेले तसा निरोप व लेखी पत्र शिवसेनेचे वतीने अभिनेते शरद पोंक्षे यांना पाठविण्यात आले. 

हीच संधी साधत २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिन साजरा करण्याची परंपरा कायम ठेवत भाजपचे शहराध्यक्ष व आमदार निरंजन डावखरे यांनी 'अथांग सावरकर' कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेतला. डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता कार्यक्रमाला सुरुवात होईल. या कार्यक्रमाला ठाणेकर नागरिकांबरोबरच सावरकरप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे जाज्वल्य विचार आत्मसात करावेत, असे आवाहन करणारे फलक ही आमदार निरंजन डावखरे ठाणे परिसरात लावले आहेत. या संपूर्ण घटनाक्रमाला श्री डावखरे यांनी 'सरकारनामा'शी बोलताना दुजोरा दिला.

शिवसेना झालीय कॉंग्रेसी आणि बेगडी सावरकर प्रेमी : डावखरे

''स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावरील शिवसेनेचे प्रेम हे बेगडी आहे. शिवसेनेचे दाखवायचे दात व खायचे दात वेगवेगळे असून, आम्ही हिंदूत्ववादी असल्याचा पोकळ आव आणला जात आहे. महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमामुळे व कॉंग्रेसच्या संभाव्य आक्षेपाच्या भीतीमुळे शिवसेनेला सावरकरांपासून दूर राहावे लागत आहे. त्यामुळे करमणुकीचे कारण दाखवून `अथांग सावरकर' कार्यक्रम रद्द करणे हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणारे आहे. सावरकरांबाबत कोणतीही तडजोड करणार नाही असे कधीकाळी म्हणणारी शिवसेना आता कॉंग्रेसी-शिवसेना होवून हिंदूत्वापासून दूरावल्याचीच ही घटना आहे," असे श्री. डावखरे यांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com