भाजपच्या एका नेत्याने माझ्याशी संपर्क साधला होता, कॉंग्रेसच्या रवी राजांचा दावा 

भाजपच्या एका नेत्याने माझ्याशी संपर्क साधला होता, कॉंग्रेसच्या रवी राजांचा दावा 

मुंबई ः युतीचा संसार मोडल्याचे भाजपने रविवारी जाहीर केल्याने मुंबईच्या महापौरपदाच्या निवडणुकीतील रंगत वाढणार आहे. भाजपने त्यासाठी "लॉबिंग' सुरू केले आहे. भाजपच्या एका नेत्याने माझ्याशी संपर्क साधला होता, अशी स्पष्ट कबुली पालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी दिली. 

उद्या (ता. 18) महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्यात येणार असल्याने भाजपने कॉंग्रेसशी केलेल्या संपर्कामुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. उद्या हे दोन्ही पक्ष कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

राज्यात सरकार स्थापन होण्यास वेळ लागत आहे. शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांची महाशिव आघाडी निर्माण होत आहे. मुंबई महापालिकेतही अशी "शिवआघाडी' होणार का, याची चर्चा सुरू आहे. सरकार स्थापन करण्याच्या जोरदार हालचाली सुरू असतानाच महापौर पदाची निवडणूक होत आहे. देशाची आर्थिक राजधानी असल्याने मुंबईच्या महापौर पदाला विशेष महत्त्व आहे. भाजपचे संख्याबळ शिवसेनेपेक्षा कमी असल्याने स्वबळावर महापौर पद मिळवणे भाजपसाठी अवघड आहे. 

महाशिव आघाडीच्या माध्यमातून सत्तेचा प्रयोग होत असताना विरोधी पक्षनेते रवी राजा यांना भाजपच्या नेत्याचा फोन आल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. भाजपने या निवडणुकीसाठी लॉबिंग केल्याचे दिसते. भाजपकडून अद्याप कोणतीही भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. कॉंग्रेस नगरसेवकांची रविवारी बैठक झाली. महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज भरायचा की नाही, याबाबत अद्याप पक्षश्रेष्ठींनी निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेच्या भूमिका गुलदस्त्यातच आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com