जयंत पाटलांविरुद्ध लढण्याची  मला भाजपची खुली ऑफर; दिलीप पाटील यांचा सांगलीत गौप्यस्फोट 

भाजपचा एक मुख्य नेता मला फोन करतो. नुसतं एकदा मुख्यमंत्र्यांना भेटा, तुमचा योग्य कार्यक्रम लावतो म्हणतोय. मला खुली ऑफर आहे. इस्लामपूर विधानसभा मतदार संघातून जयंत पाटील यांच्याविरुद्ध लढण्याची, असा गौप्यस्फोट जयंतरावांचे कट्टर समर्थक आणि जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी आज येथे केला.
जयंत पाटलांविरुद्ध लढण्याची  मला भाजपची खुली ऑफर; दिलीप पाटील यांचा सांगलीत गौप्यस्फोट 

सांगली : भाजपचा एक मुख्य नेता मला फोन करतो. नुसतं एकदा मुख्यमंत्र्यांना भेटा, तुमचा योग्य कार्यक्रम लावतो म्हणतोय. मला खुली ऑफर आहे. इस्लामपूर विधानसभा मतदार संघातून जयंत पाटील यांच्याविरुद्ध लढण्याची, असा गौप्यस्फोट जयंतरावांचे कट्टर समर्थक आणि जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी आज येथे केला. 

लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा प्रारंभ येथील विष्णूदास भावे नाट्यमंदीरमध्ये झाला. त्यावेळी दिलीप पाटील बोलत होते. राजारामबापूंनी कॉलेज युवकाला कारखान्याचा संचालक करून सन्मान केला, मी मरेपर्यंत राजारामबापूंच्या विचारांचा, त्यांच्या कुटुंबाचा पाठीराखा राहीन. मला काही मिळाले नाही तरी चालेल, मात्र मी प्रतारणा करणार नाही, असे स्पष्ट करत त्यांनी भाजपची ऑफर नाकारल्याचे सुतोवाच केले. 

विशेष म्हणजे, एकेकाळी जयंत पाटील यांचे शिलेदार राहिलेल्या व सध्या भाजपमध्ये असलेल्या  माजी मंत्री अजितराव घोरपडे, आमदार विलासराव जगताप, आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्यासमोर  पाटील यांनी "मी खाल्ल्या मिठाला जागणारा आहे," असा उल्लेख करत पक्षांतर करत उड्या मारणाऱ्यांना टोला हाणला. सध्या भाजपमध्ये 'मेगा भरती' सुरू असून इस्लामपूरमध्ये जयंत पाटील यांना घेरण्यासाठीची नियोजन लावले जात आहे. त्यात दिलीप पाटील यांचाही विचार भाजपने केल्याचे आजच्या दिलीप पाटील यांच्या गौप्यस्फोटानंतर स्पष्ट झाले.

पाटील म्हणाले, "मला काय आमिष नाही काय? मलाही आमदार व्हावे वाटते, खासदार व्हावे वाटते. भाजपचा एक मुख्य नेता फोन करतोय, एकदा मुख्यमंत्र्यांना भेटा म्हणतोय. पण, मी खाल्ल्या अन्नाला जागणारा माणूस आहे. माझा उल्लेख बापूंचा मानसपूत्र असा केला जातो, हीच माझी सगळ्यात मोठी पदवी आहे. बापूंच्या ऋणातून उतराई होण्यासाठी माझे आयुष्य आहे आणि ते मी जयंतरावांचा पाठीराखा म्हणून खर्ची करतोय.'' 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com