नाराज मेधा कुलकर्णी भाजपच्या पातळीवर बेदखल?

medha kulkarni-murlidhar mohol
medha kulkarni-murlidhar mohol

पुणे :   मेधा कुलकर्णी यांचे विधानसभेत तिकीट कापून चंद्रकांत पाटील कोथरूड मतदारसंघातून उभे राहिले होते. त्यामुळे मेधा कुलकर्णी बऱ्याच नाराज होत्या. पण वरिष्ठ पातळीवरून मेधा कुलकर्णी यांची नाराजी काढली आहे, असे सांगण्यात येत होते. विधानसभा निवडणूक होऊन सहा महिने होत आले तरी मेधा कुलकर्णी पक्षाच्या विविध कार्यक्रमांना गैरहजर असतात. विशेषत: दोन दिवसांपूर्वी कोथरूडकरांकडून महापौर मुरलीधर मोहोळ सत्कार समारंभात त्या अनुपस्थित राहिल्याने त्याविषयी चर्चा सुरू झाली.

या कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस हजर असताना मेधा कुलकर्णी कुठे दिसल्या नाहीत. त्याचबरोबर भाजपच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी  मेधा कुलकर्णी यांची या कार्यक्रमात आठवण काढली नाही.

या वेळी बोलताना चंद्रकांतदादांनी मुरलीमुळे माझा विजय झाला. नाहीतर माझा विजय कठीण होऊन बसला होता.  माझी उमेदवारी जाहीर झाल्यावर तो नाराज झाला होता. पण देवेंद्र यांच्या भेटीनंतर कामाला लागून मला विजय मिळवून दिला, असे सांगत मोहोळ यांचे कौतुक केले. मला भविष्य खूप कळत. मुरलीला खूप मोठं भविष्य आहे. मुरलीमध्ये  एका राजकीय नेत्याला जेवढे गुण आवश्यक असतात  ते सर्व गुण मुरलीमध्ये आहेत.  उद्याच्या  महाराष्ट्रातील उगवता नेता,  असे कौतुक चंद्रकांतदादांनी केले.

त्याचबरोबर फडणवीस यांनीही मोहोळ यांचे कौतुक करताना,  आम्ही आहोत तोपर्यंत त्यांना कायम संधी देऊ, असे म्हणून एक प्रकारे कोथरूडमध्ये मोहोळांना मोठी संधी असल्याचे सूचकपणे सांगितले. भाजपच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी वा नेत्यांनी मेधा कुलकर्णी यांचे नाव घेतले नाही. कुलकर्णी यांचे तर विधान परिषदेवर जाण्याचे स्वप्न आहे. पक्षश्रेष्ठींनी तसे आश्वासन विधानसभेचे तिकिट कापताना दिले होते, असे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. पण कोथरूडमधील ही भाषणे ऐकता त्यांची वाटचाल बिकट दिसते.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com